प्रो. ‌हरिलाल मेनन गोवा विद्यापीठाचे नवे ‌कुलगुरु

शुक्रवारी झालं जाहीर; २८० अर्जातून प्रो. मेनन यांची निवड

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी शोध समितीने पाच नावांची यादी सादर केली होती. त्यातून प्रो. ‌हरिलाल मेनन यांचं नाव गोवा विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी निश्चित करण्यात आलं आहे. प्रो. मेनन यांची गोवा विद्यापाठीच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रो. हरिलाल मेनन हे गोवा विद्यापाठातील सागरी विज्ञान विभागाचे डीन आहेत.

हेही वाचाः Tokyo Paralympics 2021: भारताच्या अवनी लेखराकडून आणखी एका पदकाचा वेध

प्रभारी कुलगुरू म्हणून प्रो. जनार्थनम यांच्याकडे गोवा विद्यापीठाची होती जबाबदारी

गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. वरुण साहनी यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपला. त्यानंतर नव्या कुलगुरूंची नेमणूक होईपर्यंत गोवा विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक प्रो. जनार्थनम यांची प्रभारी कुलगुरु म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

२८० अर्जातून प्रो. मेनन यांची निवड

दरम्यान, इतिहासात प्रथमच कुलगुरूपदासाठी सुमारे २८० जणांचे अर्ज आले होते. कुलगुरुपदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये गोवा, काश्मीर, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ अशा अनेक राज्यांतील उमेदवारांचा समावेश होता. विद्यापीठाच्या छाननी समितीने त्यातील सुमारे २५ जणांची निवड मुलाखतीसाठी केली होती. यात गोवा विद्यापीठातील प्रो. हरिलाल मेनन तसंच बर्नार्ड रॉड्रिग्ज या दोन प्राध्यापकांचा समावेश होता. यातून प्रो. हरिलाल मेनन यांची निवड करण्यात आली.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!