सरकार ऐकलं तर ठीक, नाहीतर आझाद मैदानावर जमून आंदोलन करावंच लागेल!

गोवा खासगी प्रवासी बस संघटनेचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गोवा खासगी प्रवासी बस संघटनेची महत्वाची बैठक शनिवारी पार पाडली. या बैठकीत प्रवासी बस व्यवसायिकांसमोर निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीबाबत सखोल चर्चा झाली. या बैठकीत सुदेश कळंगुटकर यांनी सर्व खासगी बस चालक आणि मालकांना महत्त्वाचं आवाहन केलंय.

इंधन दरवाढीनं बेहाल

राज्यातील वाढते इंधनाचे दर पाहता डिझेलच्या किंमती आता आवाक्याबाहेर गेल्या आहेत. लोकांना प्रचंड नुकसान सहन करावं लागतंय. कोरोना महामारीने सलग दुसऱ्या वर्षी खाजगी बस चालक आणि मालक अडचणीत सापडलेत. अशावेळी राज्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या या उद्योगाला सरकारनं मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्याअनुशांगाने सरकारसोबत बोलणीही सुरु आहे. पण जर ही बोलणी फिस्कटली, तर मात्र बस चालक-मालकांना आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय उरणार नाहीये, असं कळंगुटकर यांनी म्हटलंय.

हेही वाचा : Tito’sचे मालक रिकार्डो डिसोझांनी भाजप हायकमांडसमोर वाचला व्यथांचा पाढा?

अन्यथा आझाद मैदानावर एल्गार!

बस चालक आणि मालकांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत, तर आझाद मैदानात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुदेश कळंगुटकर यांना या बैठकीनंतर दिलाय. राज्यातील सर्व बस चालक आणि मालकांच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी कळकळीचं आवाहन केलंय. सरकार जर ऐकलं नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनची तारीख अद्याप निश्चित झाली नसली, तरी लवकरच याबाबत सर्व माहिती खाजगी बस चालक आणि मालकांना देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे जर ही चर्चा सकारात्मक झाली, तर त्याचीही माहिती देण्यात येईल, असं सुदेश कळंगुटकर यांनी म्हटलंय.

हेही वाचा : भाजप सरकार करतंय जनतेची लूट; महामारीच्या काळात देतंय अधिक यातना

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!