क्रिकेटपटू पृथ्वी शॉ गोव्यात

रविवारी दुपारी दाबोळी विमानतळावर झालं आगमन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ विश्रांतीसाठी गोव्यात आला आहे. रविवारी दुपारी त्याचं दाबोळी विमानतळावर आगमन झालं. विमानतळावर पृथ्वी याचे गोव्यातील मित्र राया नाईक व शैलेंद्र गोवेकर यांनी भेट घेऊन त्याचे स्वागत केलं. दाबोळी तो वस्तीला असेल व मंगळवारी माघारी परतणार आहे.

हेही वाचाः ‘नितळ डिचोली’ सत्यात उतरवण्याचा संकल्प

ई-पास नसल्याने अडवलं

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमार्गे गोव्यात येताना कोविड-19 मार्गदर्शक शिष्टाचारानुसार ई – पास नसल्यामुळे पृथ्वीला महाराष्ट्र पोलिसांनी आंबोली येथे रोखलं होतं. त्यामुळे तो चर्चेत होता. पृथ्वी भारताचा कसोटीपटू असून 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट विजेत्या भारतीय संघाचा माजी कर्णधारही आहे. आयपीएल स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटल्स संघातर्फे खेळतो.

पृथ्वी शॉ च्या गोव्यातील सुट्टीवरून होऊ शकतो वाद

महाराष्ट्रात कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे आणि असं असूनही पृथ्वी शॉ सुट्टीसाठी गोव्यात आलाय. या क्रिकेटपटूचा हा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे आणि यावर मोठा वादही होऊ शकतो. पृथ्वी शॉ आधीपासूनच टीम इंडियाच्या बाहेर आहे, जेणेकरून अशा नाजूक प्रसंगी त्याची सुट्टी घालवण्याचा निर्णय त्याच्यावर मोठं ओझं होऊ नये म्हणजे झालं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!