प्राचार्य डॉ. भूषण भावेंनी घेतली नवनिर्वाचित राज्यपालांची भेट

गोव्याच्या साहित्यिक, भाषिक स्थितीबद्दल तसंच कोरोना काळात आयोजित कार्यक्रमांबद्दल दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः केंद्रीय साहित्य अकादमीच्या कोकणी सल्लागार मंडळाचे निमंत्रक तसंच विद्या प्रबोधिनी वाणिज्य, शिक्षण, संगणक आणि व्यवस्थापन महाविद्यालय, पर्वरी, गोवा या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर भूषण भावे यांनी आज गोव्याचे नवनिर्वाचित राज्यपाल डॉक्टर पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासमवेत गोवा राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्री. राजकुमार देसाई हेही उपस्थित होते.

हेही वाचाः CORONA UPDATE | मंगळवारी पुन्हा 2 कोविडबाधितांचे मृत्यू

केंद्रीय साहित्य अकादमीतर्फे केलं राज्यपालांचं स्वागत

राज्यपाल पिल्लई यांचं गोव्यात केंद्रीय साहित्य अकादमीच्या वतीने स्वागत करून डॉ. भावे यांनी गोव्याच्या साहित्यिक, भाषिक स्थितीबद्दल तसंच कोरोनाच्या काळात आयोजित केल्या गेलेल्या कार्यक्रमांबद्दल त्यांना माहिती दिली. यावेळी राज्यपाल डॉ. पिल्लई यांनी गोव्यासंबंधी तसंच देशासंबंधी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसंच साहित्यिक विषयांवर उभयतांशी चर्चा केली.

हेही वाचाः अखिल गोवा दलित महासंघाकडून अनुराधा परवार यांना मदतीचा हात

गोव्यासंबंधी महत्त्वाची पुस्तकं दिली भेट

डाॅ. भावे यांनी त्यांना गोव्यासंबंधी काही महत्त्वाची पुस्तकं तसंच गोवा आणि केरळ यांचा समान दुवा असलेली काही पुस्तकं भेट दिली. राज्यपाल डॉ. पिल्लई यांनी आपला ‘ओ मिझोराम’ हा काव्यसंग्रह डॉ. भावे यांना देऊन त्याचा कोकणीमध्ये अनुवाद करण्याची परवानगी दिली.

हेही वाचाः श्रीमती कमलाबाई हेदे विद्यालयाचा निकाल 100 टक्के

‘गोमंतकीय मुक्तिसंग्राम व साहित्य’बद्दल दिली माहिती

गोमंतकाच्या क्रांती पर्वाला यंदा 75 वर्षं पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोमंतकीय मुक्तिसंग्राम व साहित्य’ या विषयावरील दोन दिवसांच्या आगामी परिसंवादाबद्दलही डॉ. भावे यांनी माननीय राज्यपालांना माहिती दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!