प्रिन्स ॲरॉन गोल्डनला बाल न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

अल्पवयीन मुलीचं लैंगिक छळ प्रकरण; 16 एप्रिलला केली होती अटक

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : सांताक्रूज येथील केअर अँड कॉम्पॅशन निवारा गृहातील अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी निवारा गृहाचा संचालक प्रिन्स ॲरॉन गोल्डन (59) याला पणजी महिला पोलिसांनी अटक  केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला पणजी येथील बाल न्यायालयाने 25 हजार रुपये व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचाः कॅसिनो कंपनी म्हणते कर्फ्यू वाढणार ?

पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

पणजी महिला पोलिसानी दिलेल्या माहितीनूसार, या प्रकरणी एमिडियो पिंटो यांनी 16 एप्रिल रोजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार सांताक्रूज येथील केअर अँड कॉम्पॅशन निवारा गृहाचे संचालक प्रिन्स ॲरॉन गोल्डन यांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ केल्याचे म्हटलं आहे. याची दखल महिला पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुदिक्षा नाईक याच्या मार्गदर्शनाखालील महिला पोलीस उपनिरीक्षक रीमा नाईक यांनी संशयित प्रिन्स ॲरॉन गोल्डन याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354ए, गोवा बाल कायदा 8(1), 8(2), 6(18), 6(19) आणि 12, 11(4) पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचाः मुख्यमंत्री म्हणतात, मी ठणठणीत

21 रोजी रात्री केली अटक

आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच संशयित तेव्हापासून तो फरार झाला. तसंच संशयिताने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करून पलायन झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला अटक न करण्याची कोणतीच मूभा दिली नव्हती. याची दखल घेऊन पोलिसांनी संशयित घोगळ मडगाव येथे राहत असल्याची माहिती मिळताच शुक्रवार 21 रोजी रात्री त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला प्रथम तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्यात वाढ करण्यात आली.

हेही वाचाः ACCIDENT | ट्रक घुसला गॅरेजमध्ये; केरी सत्तरी भागात अपघातांचा धोका वाढला

25 हजार रुपये व इतर अटीवर सशर्त जामीन

दरम्यान संशयिताने बाल न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. याची दखल घेऊन बाल न्यायालायने संशयिताला 25 हजार रुपये, तसेच सोमवार 31 रोजी पासून पुढील पंधरा दिवस दररोज महिला पोलिस स्थानकात हजेरी लावण्याची व इतर अटीवर जामीन मंजूर केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!