गोव्याच्या भवितव्याच्या विषयांवर खोटारड्या पंतप्रधान मोदींनी खरं बोलण्याची धमक दाखवावी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचं आव्हान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड लसीकरणाच्या आपल्या १०२ टक्के सिद्धांताने गोव्याच्या बेजबाबदार, अकार्यक्षम आणि सदोष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी आपलं स्वतःचं हसं करुन घेतलं. मुख्यमंत्र्यांचा हा सिद्धांत भाजपच्या जुमला राजकारणाशी तंतोतंत जुळणारा आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारानी नेहमीच खोटी माहिती देत लोकांची दिशाभूल केली आहे. गोव्यातील मंत्री, सरपंच तसंच कोविड योद्ध्यांकडे उद्या संपर्क साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या भवितव्याच्या विषयांवर शंभर टक्के खरं बोलण्याचं धाडस दाखवावं, असं आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिलं.

आज काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे गोवा दिवाळखोरीत निघाल्याचं सांगितलं. पर्यावरण नष्ट करण्याचा घाट भाजप सरकारने घातल्याचा गंभीर आरोप केला. १८ सप्टेंबर रोजी गोंयकारांशी संवाद साधताना मोदींनी शंभर टक्के खरं बोलण्याची धमक दाखवावी, असं गिरीश चोडणकर म्हणाले. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर आणि सेवादल प्रमुख शंकर किर्लपारकर हजर होते.

गोव्याची अस्मिता नष्ट करणारे प्रकल्प गोव्यातील बहुसंख्य पंचायतींनी नाकारले

गोव्यातील बहुसंख्य पंचायतींनी गोव्याची अस्मिता नष्ट करणारे तसंच पर्यावरणाला घातक सर्व सरकारी प्रकल्प आणि प्रस्ताव नाकारले आहेत. निसर्ग, वन्यजीव तसंच किनारपट्टीला हानी पोचवणारे प्रकल्प गोव्याला नकोत असं स्पष्ट धोरण पंचायतीनी घेतले आहे. परवा गोव्याच्या सरपंचा सोबत संवाद साधताना पंतप्रधानानी गोंयकारांना नको असलेले मोले अभयारण्यातुन जाणारे तीन प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करावी. किनारी व्यवस्थापन आराखडा पंचायतीकडे पाठवुन लोकांच्या सुचना घेण्याचे प्रधानमंत्र्यांनी जाहीर करावे. नावशी मरीना प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करण्याची धमक प्रधानमंत्री मोदीनी दाखवावी. तसंच गोव्याचे कोळसा हब करणार नाही, असं स्पष्ट वचन गोंयकारांना देऊन गोवा क्रोनी क्लबला विकणार नाही याची ग्वाही प्रधानमंत्री मोदींनी गोंयकारांना द्यावी, अशी मागणी चोडणकरांनी केली आहे.

पंतप्रधानांनी जीवनदायीनी आई म्हादई बद्दल आपली भूमीका मांडावी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप सरकारने कर्नाटकशी सौदा केलेल्या जीवनदायीनी आई म्हादई बद्दल आपली भूमीका मांडावी. मेजर पोर्टस बिलचे गोव्यावर होणारे दुष्परिणाम यावर प्रधानमंत्र्यांनी भाष्य करावं तसंच गोव्यातील नद्यांचं राष्ट्रीयकरण करण्यासाठी भाजप सरकारने चालविलेल्या प्रयत्नांवर लोकांना स्पष्ट सांगावं. राज्यातील विद्यार्थ्यांना अखंडीत इंटरनेट नेटवर्क सुविधा देण्याचं वचन पंतप्रधानांनी द्यावं, असं चोडणकर म्हणाले.

गोव्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यु आलेल्या कोविड रुग्णांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलणं गरजेचं आहे. भाजप सरकारच्या नाकर्तेपणाने मृत्यु झालेल्या कोविड रुग्णांच्या कुटूंबियांची नरेंद्र मोदींनी जाहीर माफी मागणं गरजेचं आहे, असं चोडणकर म्हणाले.

रेंद्र मोदींनी गोंयकार युवकांची माफी मागावी

गोव्यातील युवकांना नोकरी तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यास असमर्थ ठरलेल्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल तसंच आपल्या जाहिरनाम्यात सांगुनही आजपर्यंत बेरोजगारांना “बरोजगारी भत्ता” देण्यास असमर्थ ठरल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंयकार युवकांची माफी मागावी. पंतप्रधान मोदींनी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबद्दल बोलावं, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.

मोदींच्या थापांना आणि जुमलाबाजीला गोंयकार जनता बळी पडणार नाही

भाजप आणि बोलबच्चन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या थापांना आणि जुमलाबाजीला गोंयकार जनता बळी पडणार नसुन, मेरशी येथे जाहीर सभेत गोव्याला खास दर्जा देण्याचं भाषण करणारे मोदी आज गोव्याला साधं अर्थसहाय्य करण्यास अपयशी ठरले आहेत. भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Important | Tourism ओळख असलेल्या Goaला काळजी करायला लावणारी बातमी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!