पंतप्रधान मोदी आणि सरकारला कोरोना समजलाच नाही !

राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर साधला निशाणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, “अनेकदा सरकारला कोरोनासंदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. पंतप्रधान मोदींनी विजय घोषित केला, कोरोनाला हरवलं असल्याचं म्हटलं. अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही.”

“कोरोना केवळ एक आजार नाही, कोरोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, जेवढी जागा तुम्ही त्याला द्याल, हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागील वर्षी फेब्रुवारीत म्हटलं होतं, जागा बंद करा. कोरोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा.” असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी आता कोणत्याही राज्याला दोष न देता ही जबाबदारी स्वीकारायला हवी. कोरोना घालवण्यासाठी सर्व राज्याना एकत्र घेवून पुढं यायला हवं. विरोधक असले तरी त्यांचे सल्ले विचारात घ्यायला हवे. या देशातून मी कोरोना घालवणारंच, असंही पुढं येवून सांगायला हवं, असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!