करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी पूर्ण

गणेश चतुर्थीनंतरच शाळा सुरू करण्याबाबत विचार: मुख्यमंत्री

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी जोरात सुरू आहे. प्राथमिक सुविधा उभारण्याची ९० टक्के तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. गणेश चतुर्थीनंतरच शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

हेही वाचाः बालाजी गावस रविवारी मगोमध्ये

करोनाची तिसरी लाट आली तर प्राथमिक सुविधा उभारण्यासह अन्य तयारी करण्यासाठी सरकारने कृती समिती स्थापन केली आहे. कृती समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कृती समितीची बैठक झाली. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्यासह अन्य सदस्य बैठकीला उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयार

करोनाची तिसरी लाट केव्हाही आली तरी तरी त्याला तोंड देण्याची तयारी झाली आहे. गोमेकॉ तसंच जिल्हा हॉस्पिटलांमध्ये खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तिसरी लाट केव्हाही आली तरी गोवा पूर्ण सज्ज आहे, असं डॉ. बांदेकर यांनी सांगितलं.

हेही वाचाः सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणः विच्छेदनावेळी सिद्धीचा व्हिसेरा न ठेवल्यामुळे पेच

आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लोकांनी लसीचा पहिला डोस

आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. ३ लाख ४७ हजार १६३ लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. १४ लाखांहून अधिक डोस झाले आहेत. लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाचा‌ही आढावा घेतला.

हा व्हिडिओ पहाः CO OPERATIVE BANK | सहकारातील हालचालींवर सरकारचं लक्ष : मुख्यमंत्री

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!