राज्यात आज पुन्हा अवकाळी सरी शक्य…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : असनी चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरी राज्यात पावसाची शक्यता आहे. बुधवारी रात्री राज्यातील बहुतांश भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. पेडणे तालुक्यात सर्वाधिक ४५.८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून वातावरण ढगाळ राहिले, पण उष्माही जाणवत होता.
हेही वाचाःचेंबरमधील पाण्यात बुडून एका कामगाराचा मृत्यू…
‘या’ भागांत पाऊस पडण्याची शक्यता
सांगे व सत्तरी परिसरात गुरुवारी रात्री ढग दाटले होते. बुधवारी रात्री सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. आता शुक्रवारी काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी पणजीत सर्वाधिक ३२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता नाही. नंतर मात्र तापमानात २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
बुधवारी सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पेडणे येथे सर्वाधिक ४५.८ मिमी पावसाची नोंद झाली. म्हापसा ३, फोंडा १, पणजी ३.८, जुने गोवा ६.३, साखळी ९.४, वाळपई ७.५, काणकोण ७.२, दाबोळी ५.४, मडगाव १०, मुरगाव २.६ आणि सांगे १७.९ मिमी इतका पाऊस झाला. पेडण्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १८० मिमी बिगर मोसमी पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचाःगोवा : नोकऱ्यांसाठी अर्ज केलेल्या हजारो युवकांसाठी खूशखबर!…