प्रवीण आर्लेकरांचा इब्रामपूर – हणखणे ग्रामपंचायत दौरा

लोकांना दिलं मोफत कडधान्य; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली आर्थिक मदत

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मगोचे नेते प्रवीण आर्लेकरांनी पेडणे मतदारसंघातील इब्रामपूर – हणखणे ग्रामपंचायतीचा दौरा केला. या ग्रामपंचायत क्षेत्रातील इब्रामपूर-हणखणे येथील दलित वाड्याला आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी लोकांना कडधान्य वाटप केलं. हणखणे येथील एका बेकार युवतीला शिलाई मशीन दिलं. तर तौक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या इब्रामपूर येथील शेतकऱ्यांना चव्हाटा सभागृहात आर्थिक मदत दिली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

हेही वाचाः नुकसान भरपाई द्या; अन्यथा न्यायालयात जाऊ

यात आता बदल व्हायला हवा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेनुसार गोवा राज्यातील विधानसभेत मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या पेडणे मतदारसंघातील दलित समाजातील लोकांना स्वातंत्र्याच्या ६०व्या वर्षांनंतर आजही प्राथमिक गरजांसाठी सरकार दरबारी झगडावं लागतंय. पेडणे मतदारसंघात अनेक ठिकाणी दलित वाड्यांवर जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. दलितांना राहायला घरं नाहीत. काही घरात वीज आणि पाणी नाही. शौचालये नाहीत. या मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि सुमारे २० वर्षं या लोकांचं प्रतिनिधित्व केलेले उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर यांनी दलित समाजासाठी काहीच केलं नाही. मी तुमचा नोकर आहे, मी तुमचा सेवक आहे, असं म्हणताना पेडणे मतदारसंघातील लोकांनाच नोकर बनवलं. यात आता बदल व्हायला हवा. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी विजयी झाल्यावर दलित समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी विशेष प्रयत्न करणार आहे. मात्र त्यासाठी तुमची साथ महत्त्वाची आहे, असं आर्लेकर म्हणाले.

हेही वाचाः महाविद्यालयीन परीक्षांच्या तारखा विद्यापीठाकडून जाहीर

इब्रामपूर – हणखणे ग्रामपंचायतीचा दौरा

याप्रसंगी इब्रामपूर हणखणे ग्रामपंचायतीचे पंच सदस्य चंद्रशेखर खडपकर, मोपा पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले, महेश परब, रमाकांत तुळस्कर, अशोक धाऊस्कर आदी उपस्थित होते. आर्लेकरांनी मंगळवारी संध्याकाळी पेडणे मतदारसंघातील इब्रामपूर – हणखणे ग्रामपंचायतीचा दौरा केला.

हेही वाचाः काँग्रेस पक्षाचे इंधन दरवाढी विरोधात धरणे आंदोलन

मोफत कडधान्य वाटप

सुरुवातीला त्यांनी हणखणे येथे दलित वाड्यावर अर्धवट अवस्थेत असलेल्या राष्ट्रोळी सभागृहात जमलेल्या लोकांची भेट घेतली. तेथे जमलेल्या लोकांना कडधान्याचं वाटप केलं. तसंच निशा गावकर या युवतीला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिलाई मशीन दिलं. तिथे जमलेल्या युवकांना क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिलं. त्यानंतर आर्लेकरांनी इब्रामपूर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेशेजारी असलेल्या चव्हाटा सभागृहात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात नुकत्याच येऊन गेलेल्या तौक्ते वादळात नुकसान झालेल्या इब्रामपूर येथील शेतकऱ्यांना सामुहिकरित्या आर्थिक मदत केली.

हेही वाचाः CORONA UPDATE | दिलासादायक! रुग्ण संख्या घटली; रिकव्हरी रेट वाढला

आर्लेकरांनी आम्हाला योग्यवेळी मदत केली

संकटग्रस्त शेतकऱ्यांकडे लोकप्रतिनिधी या नात्याने स्थानिक आमदार उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर तसंच राज्य सरकारनचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. मात्र योग्य वेळी आर्लेकरांनी आम्हाला जी काही आर्थिक मदत केली आहे, त्यामुळे आम्ही भारावून गेलोत, असं इब्रामपूर येथील शेतकरी म्हणाले.

हेही वाचाः Vaccine सर्टिफिकेटवर झाली असेल चूक, तर घाबरू नका…

आर्लेकरांना इब्रामपूरवासियांचा पाठिंबा

आर्थिक परिस्थितीमुळे बेघर बनलेल्या इब्रामपूर येथील दलित वस्तीत प्लास्टिकच्या झोपडीत राहाणाऱ्या सगुण कदम याला आर्थिक मदत देऊन प्लास्टिकऐवजी छप्पर घालण्यासाठी आर्लेकरांनी पत्रे दिले. त्यामुळे सगुण कदम यांना पावसाळ्यात डोक्यावर छप्पर मिळालं. दरम्यान आर्लेकरांनी दलित वस्तीतील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथील लोकांच्या समस्या ऐकून आर्लेकरांना धक्काच बसला. यामुळे स्थानिक आमदार उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर यांच्या २० वर्षांतील केलेल्या कामाचा फज्जा उडाला. बाबु आजगावकर यांच्या कार्यप्रणालीला कंटाळलेल्या लोकांनी यावेळी मगोचे नेते प्रवीण आर्लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहाण्याचं आश्वासन दिलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!