राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

जीएमसीमध्ये उपचार सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पर्येचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालंय. सध्या या दोघांवरही जीएमसीमध्ये उपचार सुरु आहेत. प्रतापसिंह राणे आणि त्यांची पत्नी विजयादेवी राणे यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव आल्यानंतर त्यांना जीएमसीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

पहिला दिवस दिलासादायक

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ७४ नव्या रुग्णांचं निदान झालंय. त्यापैकी ४६ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर २८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे हा आरोग्य यंत्रणेसाठी दिलासा मानला जातोय.

रिकव्हरी रेट वाढला

आतापर्यंत ७३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे ७८ रुग्ण बरे झालेत. सध्या राज्यात ९३० एक्टीव रुग्ण असून राज्याचा रिकव्हरी रेट ९६.७४ टक्के इतका आहे. दुसरीकडे राज्यात नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झालेत. मात्र नवं वर्षाचं स्वागत करताना सोशल डिस्टन्सिंगचा मात्र पुरता फज्जा उडाला होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जातेय.

भांगरभूंय कोरोना अपडेटः • कोरोना चांचणीचो आंकडो 4 लाखां वयर पावलो. • फाटल्या 24 वरांनी 69 नवे दुयेंती सांपडले. • आतां मेरेन 739 जाणांक कोरोनान मरण आयलां. • सक्रीय कोरोना दुयेंती 930. #Goa #CoronaUpdates

Posted by Bhaangarbhuin on Friday, 1 January 2021

नव्या निर्णयाकडे लक्ष

३१ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये एसओपीचं कडक पालन होण्याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस तर नाईट कर्फ्यू लावणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, याबाबतही आता काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जातो का, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय.

हेही वाचा – SOP | राज्यात जानेवारीत नाईट कर्फ्यू शक्य, आरोग्यमंत्र्यांचे संकेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!