यूपीएससी, जीपीएससी स्पर्धा परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी : यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि जीपीएससी म्हणजेच गोवा लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी गोवेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गोवा सरकार या दोन्ही परीक्षांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी ही माहिती दिलीय.
गोव्याचं महाचॅनल गोवन वार्ता लाईव्हच्या लॉन्चींगवेळी मुख्यमंत्र्यांची हे जाहीर केलय. युपीएससी आणि जीपीएससीच्या स्पर्धा परिक्षांमध्ये गोव्यातील उमेदवारांचा अगदी अल्प सहभाग असल्याची बाब संपादक किशोर नाईक गांवकरांनी आपल्या भाषणात नमूद केली होती. यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यानी पुढील वर्षापासून प्रत्येक कॉलेजमध्ये युपीएससी आणि जीपीएससीच्या स्पर्धा परिक्षांसाठी प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.
मोलेची चिंता नको, घट दुधाचेच फुटणार
याचवेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यानी मोलेतील प्रकल्पांबाबतच्या वादावरही थोडक्यात पण महत्वपुर्ण भाष्य केलं. मोलेच्या निसर्गाची आणि जैव विविधतेची मला चिंता आहे असं विधान मुख्यमंत्र्यानी केलं. बा.भ. बोरकरांच्या माझ्या गोव्याच्या भुमित या प्रसिध्द कवितेचा आधार घेताना गोव्यात भविष्यातही दुधाचेच घट फुटणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.