भाजप सरकार गोंयकरांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी चिंतित नाहीत

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः डॉ. प्रमोद सावंत सरकारने हे सिद्ध केलं आहे की, गेल्या तीन दिवसांपासून ते वास्तव आणि गोंयकरांपासून पूर्णपणे दूर आहेत. सभागृहातील भाजप आमदारांनी दाखवून दिलं की, ना त्यांना गोव्याची काळजी आहे, ना त्यांना त्यांच्या दुःखाची जाणीव आहे. बाणावली बलात्कार प्रकरणात मुख्यमंत्री पीडितांपर्यंत पोहोचण्याऐवजी पीडितांना दोष देण्यात व्यस्त राहिले. गोव्याच्या मोठ्या भागाला उद्ध्वस्त केलेल्या पूराच्या बाबतीत भाजप सरकारने गोव्याला झालेल्या अपरिमित नुकसानीसाठी फक्त 2 लाख रुपये भरपाई दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रतिस्पर्धी आणि गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी “ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही गोंयकराचा मृत्यू झाला नाही”, अशा असंवेदनशील वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांना गोंधळात घालण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टाका आम आदमी पक्षाचे गोव्यातील संयोजक राहुल म्हांबरे यांनी केली.
हेही वाचाः तिलारी धरणाचे दरवाजे उघडले ही अफवाः कोरगांवकर
भाजपला हेडलाइन मॅनेजमेंट माहीत आहे
हे स्पष्ट आहे की भाजपला हेडलाइन मॅनेजमेंट माहीत आहे. गेल्या 3 दिवसात 3 बलात्कार झाले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी गोव्यामध्ये महिलांना अधिक आत्मविश्वास आणि सुरक्षित वाटण्यासाठी कोणतंही पाऊल उचलले नाही. गोवाच्या स्त्रियांच्या संरक्षणासाठी कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय केले गेले नाहीत, उलट लैंगिकतावादी विधानांसोबत स्त्रियांना घरातच राहण्यास सांगितलं गेलं, अशी खंत म्हांबरेंनी व्यक्त केली.
हेही वाचाः सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट?
पूरग्रस्तांना 2 लाखांची तुटपुंजी रक्कम देण्याची भाजपची इच्छा
जेपी नड्डा यांच्या स्वागतासाठी लाखो रुपये खर्च करत असताना आणि करदात्यांच्या पैशांवर 5 स्टार हॉटेल्समध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करताना, ज्यांनी पुरामध्ये आपली घरं पूर्णपणे गमावली आहेत, त्यांना 2 लाखांची तुटपुंजी रक्कम देण्याची भाजपची इच्छा आहे. एवढ्या छोट्या रकमेने आज कोणीही त्यांचे आयुष्य नव्याने कसे सुरू करू शकेल? असा सवाल म्हांबरेंनी केलाय.