मध्यरात्री वीज गायब, हरमलवासीयांमध्ये संताप

Goan Varta Live | प्रतिनिधी
हरमल : येथील किनारपट्टी भागाला लागलेले खंडित विजेचे ग्रहण सुटताना दिसत नाही. रात्री जास्त उष्मा जाणवत असल्याने विजेशिवाय राहणे कठिण मध्यरात्री वीज गायब झाल्यामुळे हरमलवासीयांनी संताप व्यक्त केला.
मधलावाडा हरमल येथे रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वीज गेल्याने डी. श्रीनिवास यांनी वीज खात्याच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला. मात्र, पलिकडून कर्मचारी मोरजीला गेले असून ते आल्यावर हरमल येथे येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिक वीज नसल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. श्रीनिवास याना पुन्हा रात्रा ३ वा. संपर्क साधल्यावर फोन व्यस्त होता. त्यामुळे सर्वांना विजेशिवाय रात्र काढावी लागली.
कर्मचाऱ्यांनो खरे बोला….
वीज गेल्यावर ड्युटीवरील नोंद करून घ्यायला हवी. तसेच दुरुस्ती काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नागरिकांची तक्रार कर्मचाऱ्यांना पाठवले पाहिजे. मात्र, कर्मचाऱ्यांकडून बेधडक खोटी माहिती दिली जाते, त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली