पोस्टमनांनी घेतली दक्षिण गोवा खासदारांची भेट…

केंद्रीय मंत्र्यांकडे विषय मांडणार; खासदार सार्दिन यांचे आश्वासन

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : फोंडा परिसरातील काही पोस्टमनांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे तर आणखी काहींना कामावरून काढण्यात येणार आहे. याबाबत या पोस्टमनांनी आंदोलनही केले होते. रविवारी हे पोस्टमनांनी दक्षिण गोवा खासदारांची भेट घेतली. खासदार सार्दिन यांनी हा विषय मंत्र्यांकडे मांडण्यात येईल, असे आश्वासन देतानाच पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली.
हेही वाचाःInterview | भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा डेव्हलपमेंट फॉर्म्यूला…

पोस्टमनांनी दक्षिण गोवा खासदार सार्दिन यांची भेट घेतली

दक्षिण गोव्यातील फोंडा परिसरात गेली आठ ते पंधरा वर्षे कार्यरत असलेल्या पोस्टमनांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. यानंतर सदर पोस्टमनांनी कार्यालयाबाहेर आंदोलनेही केली होती. आता आणखी काही पोस्टमनना कामावरून काढून टाकण्यात येणार असल्याचे समजल्याने चिंताग्रस्त झालेल्या पोस्टमनांनी दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची भेट घेतली.
हेही वाचाःगोवन वार्ता लाईव्ह वेबसाईटच्या द्वितीय वर्ष पूर्तीनिमित्त…

पोस्टमनांना कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू

सार्दिन यांच्या भेटीनंतर पोस्टमनांनी माहिती दिली की, कित्येक वर्षे पोस्ट खात्यात काम केल्यानंतरही तत्काळ कामावरून काढून टाकण्याचा प्रकार धक्कादायक आहे. याबाबत खासदार सार्दिन यांची भेट घेतली आहे. खासदार सार्दिन यांनी सर्वांसमोरच पोस्ट खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. सध्या ज्या पोस्टमनांना कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती थांबवण्यात यावी, यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा केली जाईल. तसेच जे पोस्टमन काढून टाकण्यात आले आहेत, त्यांच्या जागांवर गोव्यातील स्थानिकांना घेण्याच्याही सूचना केल्या. खासदार सार्दिन यांच्या भेटीनंतर काहीतरी उपाय निघेल अशी आशा पोस्टमनांनी व्यक्त केली.
हेही वाचाः१३ जणांना आमिष दाखवून ७.३२ लाख रुपयांचा गंडा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!