टपाल विभाग प्रकाशित करणार काजू फेणीवर ‘स्पेशल कव्हर’

गोव्याच्या काजू फेणीचा जगभर प्रचार करण्यासाठी विशेष उपक्रम; पणजीतील टपाल भवनात होणार कार्यक्रमाचं आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा म्हटले की डोळ्यासमोर सुंदर समुद्रकिनारे, टुमदार घरे, पर्यटकांची अलोट गर्दी, चविष्ट सी फूड आणि पोर्तुगीझांचा प्रभाव असलेली जीवनशैली व खाद्यसंस्कृती, येथील जगप्रसिद्ध असलेली काजू फेणी हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर हमखास उभं राहतं. गोव्याच्या याच काजू फेणीचा जगभर प्रचार, प्रसार व्हावा यासाठी टपाल विभाग गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी काजू फेणीवर ‘स्पेशल कव्हर’ प्रकाशित करणार आहे. पणजीतील टपाल भवनात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचाः DELTA | रत्नागिरीत डेल्टा प्लसचे रुग्ण, प्रशासन ॲलर्ट मोडवर

पोर्तुगीजांनी आणले काजू गोव्यात

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज गोव्यामध्ये आले. त्यांच्याबरोबर त्यांनी पोर्तुगालमधील अनेक भाज्या आणि फळे आणली. आज आपल्या आहाराचा अविभाज्य भाग असलेले अनेक खाद्यापदार्थ वास्तविक पोर्तुगीझांच्या सोबत भारतात आले आहेत. बटाटे, टोमाटो, मिरच्या, अननस आणि काजू हे पोर्तुगीझांबरोबर भारतामध्ये आलेल्या अनेक पदार्थांपैकी आहेत. काजू वास्तविक ब्राझीलमध्ये पिकविला जात असे, त्याकाळी ब्राझील पोतृगीझांच्या अधिपत्याखाली होते. जेव्हा पोर्तुगीज भारतामध्ये, गोव्यामध्ये आले, तेव्हा त्यांनी तेथील जमीन काजूच्या लागवडीसाठी उत्तम असल्याचे ओळखून तिथे काजूची लागवड सुरु केली. किंबहुना ब्राझील मध्ये काजूंची होत असे, त्यापेक्षा उत्तम पैदास गोव्यामध्ये होत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं.

काजू आंबवून तयार झाली फेणी

जसजशी काजूची लागवड वाढू लागली, तसतसे काजू मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ लागले. हेच काजू आंबवून त्यापासून ‘फेणी’ तयार केली गेली. फेणी काजूंपासून तयार करण्याची कल्पना सर्वप्रथम कोणाला सुचली, याचा इतिहासामध्ये स्पष्ट उल्लेख सापडत नसला, तरी काही १७४० सालच्या पोर्तुगीज इतिहासकारांच्या लेखनामध्ये काजू आंबवून त्यापासून फेणी तयार केली जात असल्याचे उल्लेख सापडतात.

हेही वाचाः गोवा युवक काँग्रेसला राहुल गांधींकडून शाबासकी

फेणी हा शब्द, संस्कृत शब्द ‘फेना’ या शब्दावरून आला आहे. फेना या शब्दाचा अर्थ फेस असा असून, हे बाटलीतून ओतल्यानंतर त्यावर फेस येत असल्याने याला फेणी असं नाव पडल्याचं म्हणतात.

हा व्हिडिओ पहाः Video | DOG | RESCUE | नदीत बुडवून मारण्याचा प्रयत्न फसला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!