Positivity Rateमध्ये गोवा दुसऱ्या स्थानी! पण फरक फारसा नाही

पहिल्या स्थानी पुद्दुचेरी तर गोवा नंबर दोनला

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत सरकारकडून देशातील वेगवेगळ्या राज्यांचे पॉझिटिव्हिटी रेटची माहिती जारी करण्यात आली आहे. या यादीत काही दिवसांपूर्वी नंबर एकला असणारं गोवा हे राज्य आता दुसऱ्या नंबरवर गेलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच नंबर दोनला असणारं हरयाणा हे राज्य नंबर दोनवरुन नंबर ६ वर गेलंय. दरम्यान, गोवा हे दुसऱ्या नंबरवर जरी गेलं असलं तरी गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि नंबर एकला असणाऱ्या पुद्दुचेरीचा पॉझिटिव्हिटी रेट यात निव्वळ ०.३% इतकाच फरक आहे. म्हणजेच जवळपास काही फरक नसल्यासारखंच आहे.

उत्तर गोव्यात चिंता!

जास्त फरक नाही!

पुद्दुचेरीचा पॉझिटिव्हिटी रेट हा ४२.३ टक्के असून गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ४२ टक्के नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या पश्चिम बंगाल हे राज्य पॉझिटिव्हिटी रेटमध्ये नंबर तीनला आहे. पश्चिम बंगालचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३३.४ टक्के इतका नोंदवण्यात आलाय.

3 राज्यांमध्येच दिलासा

१५ टक्क्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या राज्यांची संख्या २४ असून १० राज्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट हा ५ ते १५ टक्क्यांमध्ये असल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे फक्त ३ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा ५ टक्क्यापेक्षा कमी असल्याचं दिसून आलंय.

महाराष्ट्रासह दिल्लीचेही आकडे सुधारले!

लक्षणीय बाब म्हणजे कोरोनामुळे दिवसेंदिवस संख्या वाढत असणाऱ्या महाराष्ट्र आणि दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट हा २० टक्क्यांच्या खाली आलाय. मात्र ज्या २४ राज्यांचा उल्लेख १५ टक्के पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये करण्यात आला आहे, त्यात उत्तर प्रदेश आणि गुजरातचा उल्लेख नाहीये. गुजरातचा पॉझिटिव्हिटी रेट हा ८.६९ तर उत्तर प्रदेशचा पॉझिटिव्हिटी रेट हा ९.९३ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

आकडे खरे आहेत ना?

दरम्यान, वाढती रुग्णसंख्या, मृत्यू झालेल्यांची आकडेवारी यावरच्या उलटसुलट चर्चांमुळे पॉझिटिव्हिटी रेटबाबत देण्यात आलेली गुजरात आणि उत्तर प्रदेशची आकडेवारीही संशयास्पद असल्याचा सूर उमटतोय. दरम्यान, तेलंगणाचा पॉझिटिव्हिटी रेट हा १ टक्क्यापेक्षाही कमी असल्याचं नोंदवण्यात आलं आहे. तेलंगणाचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.८१ टक्के इतका नोंदवण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!