स्वतःला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एक आठवडा उशिरा लॉकडाऊन करणार

आमदार रोहन खंवटेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः निवडणुकीनंतर लगेचच लॉकडाऊन जाहीर करण्याच्या आरोपापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत किमान एक आठवडा उशीरा राज्यात लॉकडाऊन जाहीर करणार, असा आरोप पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंनी केला. त्यांनी ट्विट करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांवर निशाणा साधलाय.

हेही वाचाः खरंच #Lockdown हा एकमेव पर्याय उरलाय का? ‘या’ आहेत ४ शक्यता

राज्यात 23 एप्रिलला झालेल्या 5 पालिकांच्या निवडणुकांचा उल्लेख करत खंवटेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. 26 एप्रिलला जाहीर झालेल्या 5 पालिकांच्या निवडणुकीच्या निकालानंतर 5 पैकी 3 पालिकांमध्ये भाजपला आपली सत्ता स्थापित करण्यात यश आलंय.

हेही वाचाः CORONA UPDATE | बापरे! गेल्या २४ तासांत तब्बल ३८ जणांचा मृत्यू

किमान 1 महिन्याचा लॉकडाऊन हवाच

राज्यातील कोविडची प्रकरणं वाढतायत. तसंच मृतांचा आकडा घाबरवणारा आहे. या गोष्टी लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी सोमवारी लॉकडाऊनची गरज बोलून दाखवली. किमान 1 महिन्याचा तरी लॉकडाऊन आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.

खंवटेंचा सावंतांवर निशाणा

त्यानंतर मंगळवारी आमदार खंवटेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत ट्विट केलं. ट्विटमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना त्यांनी टॅग केलं. खंवटे ट्विटमध्ये म्हणाले, पालिका निवडणुकांच्या निकालानंतर वादाच्या भोवऱ्या अडकू नये यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लॉकडाऊन किमान एक आठवडा उशीरा जाहीर करणार.

ही लपवाछपवी कशासाठी?

जेव्हा ताबडतोब लॉकडाऊन करणं ही काळाची गरज बनलीये तेव्हा गोंयकारांचा जीव धोक्यात घालून हा लपवाछपवीचा खेळ कशासाठी? असा सवाल खंवटेंनी मुख्यमंत्र्यांना केलाय.

सोमवारी राज्यात तब्बल 2 हजार 321 नव्या कोरोना बाधितांची नोंद झालीये. तर जवळपास 38 लोकांचा कोविडमुळे मृत्यू झालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!