Online वर्ग सुरु असताना अचानक Porn Video लागला आणि विद्यार्थी शिक्षक भांबावले

ऑनलाईन वर्गात नको तो प्रकार झाल्याचं उघडकीस

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : ऑनलाईन शिक्षणाचे गोडवे अनेकजण गातात. पण या ऑनलाईन शिक्षणातील सावळा गोंधळही तितका चर्चिला जातोय. एकीकडे काही ठिकाणी नेटवर्कमुळे ऑनलाईन शिक्षणात अडचणी आल्याचं पाहायला मिळालेलंय. तर दुसरीकडे तर चक्क ऑनलाईन वर्ग सुरु असतानाच अचनाक पॉर्न फिल्म लागल्याचं समोर आलंय.

कोणत्या शाळेत?

कांदोळीमधील एका विद्यालयात इयत्ता आठवीचे ऑनलाईन वर्ग सुरू होते. मात्र वर्ग सुरु असतानाच हॅकर्सनी ऑनलाईन क्लास हॅक केला. फक्त ऑनलाईन क्लास हॅक केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण हॅकर्सनी ऑनलाईन क्लास हॅक करुन चक्क पॉर्नोग्राफी फिल्म लावल्यामुळे ऑनलाईन क्लासमध्ये खळबळ उडाली. ऑनलाईन क्लासमध्ये मुलं घरातून वर्ग अटेंड करत असणार हे तर स्पष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकही या सगळ्याप्रकारामुळे अचंबित झालेत.

हेही वाचा : सभागृहात बसून पॉर्न कंटेट स्क्रोल करताना राजकीय नेता कॅमेऱ्यात कैद

खरंच हॅक झाला असेल की…?

हे प्रकरण बराच वेळ चालल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, आता संदर्भात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात हॅकर्सविरोधात गुन्हा नोंद केलाय. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गुगल मीटवर इयत्ता आठवीचा ऑनलाईन वर्ग सुरू होता. क्लास सुरू असतानाच ऑनलाईन क्लास हॅक करून हॅकर्सनी पॉर्नोग्राफिक फिल्म लावल्यामुळे वर्गात सहभागी सर्वांचीच तारांबळ उडाली. हॅकर्सनी क्लास हॅक केल्याचा दावा शाळेने केल्यामुळे पोलिसांनी अज्ञात हॅकर्सविरोधात गुन्हा नोंद केलाय. ऑनलाईन क्लासचे लिंक हॅक करून पॉर्नोग्राफिक फिल्म लावल्याचे शाळेच्या व्यवस्थापनानं तक्रारीत म्हटलंय. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.

हेही वाचा : CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दोन दिवस वाढ

सुरक्षेचं काय?

दरम्यान, हे प्रकार वेळीच रोखायचे असतील ऑनलाईन शिक्षणातल्या त्रुटींकडेही लक्ष देण्याची गरज पालकांनी व्यक्त केली आहे. आधीच नेटवर्कअभावी उडालेला ऑनलाईन शिक्षणाचा गोंधळ आणि त्यानंतर आता हे ऑनलाईन वर्गात पॉर्न फिल्म लागण्यासारख्या प्रकारांनी पालकांची चिंता आणखीनंच वाढवलीये, हे नक्की.

हेही वाचा : पंचनामा | पूनम पांडे, पॉर्नोग्राफी आणि आपला गोवा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!