होंडा औद्योगिक वसाहतीमधील खराब गटार अवस्थेचा वाहनचालकांना त्रास

गटार व्यवस्था कोलमडली; जोरदार पाऊस सुरू होण्यापूर्वी गटार व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः  पावसाळी मोसमात होंडा औद्योगिक वसाहतीमधील गटार व्यवस्था पूर्णपणे खराब झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच

गटार व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज

सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे सत्तरीत तालुक्‍यातील गटार व्यवस्थे संदर्भातील प्रश्न ऐरणीवर आलाय. खासकरून होंडा औद्योगिक वसाहतीमधील गटार व्यवस्था पूर्णपणे खराब झाली आहे. पावसाळ्यात या गटार व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास पावसात त्याचं प्रतिकूल परिणाम वाळपई- होंडा मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सहन करावे लागणार आहेत.

हेही वाचाः तब्बल 50 टक्के लशीचा साठा बड्या खासगी रुग्णालयांकडं !

पावसाचे पाणी शिरले स्थानिकांचा घरात

काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसामुळे हे गटार मातीने भरलेय. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत होते. यामुळे वाहनचालकांना बऱ्याच प्रमाणात त्रास सहन करावा लागला. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी असलेल्या कांचन नाटेकर यांच्या घरामध्ये हे पाणी घुसल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गटार व्यवस्था नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कांचन नाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत होंडा पंचायतीचे व्यवस्थापन दुर्लक्ष करत असून यामुळे आपल्याला नुकसान सोसावं लागतंय असा आरोप कांचन नाटेकर यांनी केलाय.

हेही वाचाः VACCINATION | लस घ्यायला जाताय? मग आधी हे वाचा!

वाहनचालक तसंच स्थानिकांना सहन करावा लागेल त्रास

आताच कुठे पावसाला सुरुवात झालीये. जसजसा पाऊस वाढेल तशी या भागात गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. होंडा औद्योगिक वसाहतीमधील रस्ते सुधारणे, गटार व्यवस्था याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय. यामुळे याचा अनेक स्तरावर प्रतिकूल परिणाम होतोय. याबाबत अनेक वेळा निवेदनं सादर करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे होंडा औद्योगिक वसाहतीत गंभीर परिस्थिती निर्माण झालीये. महत्त्वाचं म्हणजे गटार व्यवस्था सोयीस्कर करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा पावसाळी मोसमात पाण्याचा निचरा होण्यासाठी वाट मिळत नसल्यानं पाण्याचा प्रवाह या रस्त्यावरून वाहत असतो. यामुळे सदर रस्त्यावरून वाहतूक करताना नागरिकांना तसंच  वाहनचालकांना समस्यांना सामोरं जावं लागतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!