पणजी शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती

रिव्होल्यूशनरी गोवन्सचे अध्यक्ष विरेश बोरकर यांची टीका; खराब रस्त्यांमुळे लोकांचे हाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः पणजीला स्मार्ट सिटी म्हणणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असं रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी)चे अध्यक्ष विरेश बोरकर यांनी गोव्याच्या रस्त्यांची स्थिती दर्शविताना सांगितलं. त्यांनी यावेळी अटल सेतु पुलाजवळील तीन जंक्शन रस्त्याची दुर्दशा देखील दाखवली. हा रस्ता खराब असल्यानं या रस्त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत, असं ते म्हणाले.

हेही वाचाः नवा ‘ड्रोन नियम मसुदा’ जारी

पावसामुळे राजधानीची दशा

जेव्हा गोव्याचे रहिवासी सरकारला वेगवेगळ्या प्रकारचा कर भरत असतात तेव्हा त्यांना खराब रस्ता का म्हणून दिला जातो, असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. सरकारला लोकांची काडीचीही किंमत नाही हे त्यांच्या वागण्यावर सिद्ध होत आहे. पणजी गोव्याची राजधानी असूनसुद्धा ही परिस्थिती पाहवत नाही. सध्या पावसामुळे स्मार्ट सिटीचे काय हाल झालेत ते लोकांनी अनुभवलेले आहेत असंही ते म्हणाले.

हेही वाचाः वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन संशयितांना अटक

खराब रस्त्यांमुळे वाहन चालकांना होतो त्रास

असल्या खराब रस्त्यामुळे लोकांना आपली वाहनं दरवेळी दुरुस्त करावी लागतात. त्यासाठी येणारा खर्च सामान्य लोकांना कसा परवडेल. त्यात भर म्हणून पेट्रोलचे दरही वाढत चालले आहेत. लोकांनी कसं जगायचं, असा प्रश्न त्यांनी केला. खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिकांनाही त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचाः CORONA UPDATE |देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट

सरकार स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त

गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिपक पाऊस्कर यांनी गोव्याचे रस्ते इंटरनॅशनल बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण रस्त्यांची दुर्दशा पाहता त्यांना लाज वाटायला हवी, असं विधान आरजीचे विश्वेश नाईक यांनी केलं. त्यांनी यावेळी रस्त्यावर झालेल्या अपघातांचीही लोकांना उदाहरणं दिली. ते म्हणाले की गोव्यात ३०० हुन अधिक अपघात होतात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही जास्त आहे. तरी सरकारला स्वतःचे खिसे भरण्यापलीकडे दुसरं काही सुचत नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!