पूनम पांडेला पती सॅम बॉम्बेसह कळंगुट पोलिसांकडून अटक

अश्लील व्हिडिओप्रकरणी कारवाई

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री तथा मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिला कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पूनमचा पती तथा दिग्दर्शक सॅम बॉम्बे (Sam Bombay) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कळंगुट पोलिस काणकोणकडे निघाले आहे.

काणकोण इथल्या चापोली धरणावर हा वादग्रस्त व्हिडिओ शूट करण्यात आला होता. ज्यात पूनम पांडे नग्नावस्थेत दिसते. यावरून गोव्यात मोठी नाराजी व्यक्त होत होती. स्थानिक रहिवाशांनी काणकोण पोलिसांत तक्रार देत पूनमवर कारवाईची मागणी केली होती. तसेच काणकोण बंदचा इशारा दिला होता. या प्रकरणी काणकोणचे पोलिस इन्स्पेक्टर तुकाराम चव्हाण आणि दोन पोलिस शिपायांना निलंबित केलं होतं. मात्र पूनम व तिच्यासोबत असणार्‍या इतरांवर कारवाई झाली नव्हती.

सिकेरी इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पूनम व तिचा पती थांबले होते. ही माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी हॉटेलमधून दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यांना काणकोण पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे.

पहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!