बापरे! 12 वर्षीय मुलगी खेळता खेळता गटारात पडली आणि जागीच गेली

पालकांनो, आपल्या मुलांवर लक्ष ठेवताय ना?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एक अत्यंत धक्कादायक बातमी फोंडा भागातून हाती येते आहे. फोंडामध्ये 12 वर्षीय मुलीचा खेळता खेळता गटारात पडून मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

फोंड्यातील कासारवाडा दत्तगड बेतोडामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारात ही मुलगी आपल्या घराशेजारीच खेळत होती. आपल्या शेजारील मित्रमैत्रिणींसह 12 वर्षांची चिमुरडी खेळण्यात दंग झाली होती. मात्र खेळता खेळता या मुलीचा तोल गेला आणि ती गटारात पडली. गटारात पडल्यानंतर या मुलीच्या हनुवटीला आणि मानेला जबर दुखापत झाली होती.

जागीच जीव गेला!

मुलगी गटाराच पडल्याचं लक्षात आल्यानंतर तिला तातडीनं उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच तिचा जीव गेला असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, रुग्णालयात नेल्यानंतर या मुलीला मृत घोषित करण्यात आलंय.
फोंडा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन तिचा मृतदेह बांबोळीतील जीएमसीमध्ये पंचनामा करण्यासाठी पाठवला. फोंडा पोलिस सध्या पुढील तपास करत आहेत.

मुलांवर लक्ष ठेवा!

12 वर्षांच्या मुलीचा असा अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्यानं तिच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मृत्यू झालेल्या चिमुरडीचं नाव मजेरिया मोहम्मद सेन असल्याचं कळतंय. हे कुटुंबीय मूळचं कर्नाटकातील बेळगावचं असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे आपल्या मुलांकडे बारीक लक्ष ठेवा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!