पॉलिटेक्निक परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय)ची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या विद्यार्थी प्रतिनिधींसह नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने मंगळवारी शिक्षण संचालकांची भेट घेऊन ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी केलीये.

हेही वाचाः मी प्रियोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार

१५०० अंतिम वर्षाचे विद्यार्थी देणार परीक्षा

शासकीय पॉलिटेक्निक पणजी, डिचोली, कुडचडे, आग्नेल पॉलिटेक्निक, वेर्णा, शिपबिल्डिंग इन्स्टिट्यूट वास्को या संस्थेच्या २८ विभागांमधील १५०० अंतिम वर्षाचे विद्यार्थी या महामारीच्या परिस्थितीत ऑफलाइन पद्धतीने परीक्षांना उत्तर देणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे, असं एनएसयूआयने निवेदनात म्हटलंय.

हेही वाचाः छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील तीन चित्रे प्रकाशात

ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना कोविडचा संसर्ग होण्याचा धोका

तरुणांसाठी लसीकरण नुकतंच सुरू झालंय आणि प्रत्येकाला लस देण्यास बराच वेळ लागेल, जर विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत ऑफलाइन परीक्षा देण्यास भाग पाडलं तर विद्यार्थ्यांना कोविड-19 चा संसर्ग होण्याचा धोका आहे, असं एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी म्हणाले.

हेही वाचाः स्वतंत्र कायद्यानंतरही सामाजिक बहिष्काराचे 6 वर्षात 104 गुन्हे

आमच्या तक्रारींचं निवारण करा

मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना विनंती करतो की त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून त्यांच्या क्षमतेनुसार आमच्या तक्रारींचं निवारण करावं. सध्याच्या परिस्थितीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. मुख्यमंत्र्यांनी आता पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे, असं चौधरी म्हणाले.

हेही वाचाः आमदाराने फक्त स्वतःचा विकास केला

ऑनलाईन परीक्षा घ्या

जेव्हा गोवा विद्यापीठ आणि त्याची संलग्न महाविद्यालये ऑनलाइन परीक्षा घेण्यास तयार आहेत, तेव्हा तंत्रशिक्षण संचालनालय ऑफलाइन परीक्षांवर का ठाम आहे? असा प्रश्न चौधरींनी केलाय. डीटीईने ५ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू होणाऱ्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, असं चौधरींनी सुचवलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!