‘काँग्रेसकडे काहीही व्हिजन नसल्यानं वैतागलो’, काँग्रेसला घरचा आहेर

झेडपी निवडणुकीत काँग्रेसला पहिला धक्का

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : मोरजी जिल्हा पंचायत निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार महेश कोनाडकर यांनी निवडणुकीतून माघार घेऊन मगो चे उमेदवार श्रीधर मांजरेकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मांद्रेमध्ये जित आरोलकर यांच्या कार्यलयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मगोचे नेते जित आरोलकर, मगोचे उमेदवार श्रीधर मांजरेकर, सरपंच आम्रोज फर्नांडिस आदी उपस्थित होते.

काँग्रेसवर टीका करताना महेश कोंनाडकर यांनी म्हटलंय की,

मोरजी मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार महेश कोनाडकर यांनी बोलताना काँग्रेस पक्षाने आजपर्यंत कोणत्याच प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला नाही. लोकांसमोर कोणता कार्यक्रम घेऊन आपण जाणार होतो. काँग्रेसकडे काहीही व्हिजन नसल्याने आपण वैतागलो. भाजपचा पराभव करण्यासाठी पाठिंबा महेश कोंनाडकर यांनी बोलताना भाजपचा उमेदवार विजयी होऊ नये म्हणून आपण मगोचे श्रीधर माजरेकर यांना आपला पाठिंबा दिलाय.

मगोचे नेते जित आरोलकर यानी बोलताना जिल्हा पंचायतिच्या निवडणुकीत मोरजीतून श्रीधर मांजरेकर, धारगळ आत्माराम धारगलकर आणि तोरसे प्रियांका महाले हे तिन्ही उमेदवार विजयी होणार असा विश्वास व्यक्त करून हरमल मतदार संघातून मगोने आपली उमेदवारी यापूर्वीच मागे घेतलेली आहे. या मतदार संघात कुणाला पाठिंबा द्यायचे हे दोन दिवसात मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर जाहीर करणार असल्याचे सांगून मोरजी मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार महेश कोनाडकर यांनी आपला पाठिंबा मगोला देऊन मगोच्या उमेदवाराची ताकत वाढवण्यासाठी मदत केल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो असे जाहीर केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!