तयारी कुठपर्यंत? झेडपी निवडणुकीच्या उमेदवारांसोबत काँग्रेस नेत्यांची बैठक

झेडपी निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात काँग्रेसच्या झेडपी उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसने जिल्हा पंचायत उमेदवारांच्या तयारीचा आढावा घेतला सत्ताधारी भाजपला पराभूत करण्याचा विश्वास यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांनी व्यक्त केलाय. उत्तर गोव्यातील विविध मतदार संघातील झेडपी उमेदवारांनी कॉंग्रेस हाऊसमध्ये झेडपी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी गिरीश चोडणकर, दिगंबर कामत आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि विजय भिके हे देखील उपस्थित होते.

काँग्रेसने आपल्या उमेदवारांसोबत तयारीची चर्चा केली. दरम्यान कुठून कोण झेडपीच्या रिंगणात उतरलंय त्यावर एक नजर टाकुयात.

काँग्रेसची यादी

कोलवाळ – सतीश चोडणकर
पेन्हा दी फ्रान्स – पेद्रीन्हा फर्नांडिस
कळंगुट – लॉरेन्स फर्नांडिस
होंडा – रमेश पानसेकर
रेईश मागुश – हेमंत मावळणकर
नगरगाव – उषा मेस्त
हळदोणा – रुबी हलर्णकर
हणजूणा – संगीता लिंगुडकर
शिवोली – सुचिता पेडणेकर
मये – प्रसाद चोडणकर
खोर्ली-जुनेगोवे विशाल वळवईकर
चिंबल – सुदेश कलंगुटकर
सेंट लॉरेन्स – अँथनी फर्नांडिस
लाटंबार्से – गोविंद मांद्रेकर
सुकूर – सर्वेश नाईक
शिरसई – उमाकांत कुंडईकर

मांद्रेत धक्का?

दुसरीकडे काँग्रेसचे मांद्रेतील उमेदवारांनी मगोच्या उमेदवाराला पाठिंबाल दिल्यानं चर्चांना ऊत आलाय. अशातच कॉंग्रेस पक्ष काही मतदारसंघांतील उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचं सांगितलं जातंय. ज्यांच्याकडे विजयाची जोरदार शक्यता आहे, अशांना पाठिंबा देण्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. भाजपाला अनुकूल असलेल्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी हा पाठिंबा दिला जात असल्याचं बोललं जातंय.

वाचा – झेडपीची धामधूम! काँग्रेसला पहिला धक्का

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!