भाजपानं झेडपी अध्यक्षपदासाठी निश्चित केली ‘ही’ नावं

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : झेडपीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज (गुरुवारी 7 जानेवारी) पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपने आपले नवे चेहरे समोर आणले आहेत. उत्तर गोव्यात कार्तिक कुडणेकर तर दक्षिण गोव्यात सुवर्णा तेंडूलकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांचीही नावं अध्यक्षपदासाठी निश्चित मानली जात आहेत. लवकरच या दोघांच्या नावांची अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देत भाजपनं रणनिती आखली असल्याची चर्चा रंगली आहे.
ताजी अपडेट

झेडपीमध्ये बाजी
झेडपीची निवडणूक 12 डिसेंबरला पार पडली होती तर 14 डिसेंबरला निवडणुकीचा मतमोजणी झाली होती. या निवडणुकीत भाजपनं निर्विवाद वर्चस्व राखलं होतं. आगामी विधानसभा निवणडुकांच्या पार्श्वभूमी मिनिविधानसभा मानल्या जाणाऱ्या झेडपी भाजपानं विरोधकांचा सुपडा साफ केला होता. त्यानंतर सगळ्यांचंच लक्ष होतं ते अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीकडे. आता याबाबतीची नावं निश्चित झाली असून आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यताय.
उपाध्यक्षपदासाठी कोण?
सुवर्णा तेंडूलकर यांचा सावर्डेतून विजय झाला होता तर सुकूरमध्ये कार्तिक कुडणेकर यांनी भाजपचा विजयी झेंडा फडकावला होता. नेमके भाजपेच कोणत्या मतदारसंघातून कोणते उमेदवार जिंकून आले होते. उपाध्यक्षपदासाठी दक्षिण गोव्यात खुशाली वेळीप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खुशाली वेळीप या उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. तर उत्तर गोव्यातीलही उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. उत्तर गोव्यात दिशा कांदोळकर यांना उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.