नक्की सद्बुद्धी कुणाची? काँग्रेसच्या घेरावाला तोंड देण्यासाठी भाजपची आधीच फिल्डिंग!

साखळीत भाजप कार्यकर्ते एकवटले

Goan Varta Live | प्रतिनिधी

साखळी : साखळीतून मोठी बातमी हाती येते आहे. साखळीत मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते झेंडे घेऊन साखळी हाऊसिंग बोर्ड जंक्शनजवळ जमले आहेत. या ठिकाणी मोठा राडा झाल्याचं प्रथमदर्शनी फोटो पाहून कुणालाही वाटेल. पण असं काहीही झालेलं नाही. ही गर्दी आहे निव्वळ भाजप आणि त्यातही प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची.

का झाली गर्दी?

काँग्रेसनं आज सद्बुद्धी यात्रा काढण्याचा निश्चय केलाय. मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी काँग्रेसनं या यात्रेचं आयोजन केलं आहे. पण त्याआधीच सतर्क असलेल्या भाजप समर्थकांनी साखळीत एकत्र येत भाजपला आव्हान देत मुख्यमंत्र्यांना एकप्रकारे सुरक्षा कवच घातल्याची चर्चा रंगली आहे.

काय म्हणतंय काँग्रेस?

गोव्याचे सदोष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. भाजप त्यांच्यावर उपचार करण्याची शक्यता कमीच आहे. कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्याचे डोके ठिकाणावर यावे व त्यांना त्यांच्या पदाच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी रविवार दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या साखळी येथिल निवासस्थानी “सद्बुद्धी यात्रा” आयोजित केली असल्याची माहिती कॉंग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दिली आहे.

सद्बुद्धी की दुर्बुद्धी?

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णवाढी अनियमितपणे कमीजास्त नोंदवली जाते आहे. मृत्यदर तर अजिबात नियंत्रणात असल्याच दिसत नाहीये. अशातच एकीकडे काँग्रेसनं अधिवेशनाच्या अत्यंत महत्त्वाच्या सत्रात दांडी मारुन सभात्याग केला. याचा फायदा उचलत भाजपनं आपल्याला हवी तशी विधेयकं मंजूर करुन घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. या सगळ्यानंतर कोण जास्त बुद्धीवान आहे, यावरुन राजकीय तज्ज्ञ तर्क वितर्क लढवू लागले होते. मात्र अशातच राज्यातील राजकारण्यांनी सत्येंदर जैन यांचे शब्द खरे ठरतील की काय, अशी वर्तवणूक केल्याचंही बोललं जातंय.

हेही वाचा : हॉटेलच्या हितासाठी सरकारी निधीचा गैरवापर? जलस्त्रोत खात्याकडे तक्रार

एकीकडे भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत गर्दी केली. तर दुसरीकडे आता काँग्रेसही यात्रा काढत आपल्या स्टाईनं मुख्यमंत्र्यांनी घेरण्याच्या इराद्यात असल्यामुळे मोठा तणावर साखळीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तैनात करण्यात आला असून रविवारी या संपूर्ण घटनेकडे राज्याची नजर लागली आहे. अशातच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा जो फोटो समोर आला आहे, त्यावरुन सोशल डिस्टन्सिंग किती पाळलं गेलंय, याचीही उपहासात्मक चर्चा होतोय. तर दुसरीकडे राज्यात कर्फ्यू लागू केलेल्याचं धक्कादायक वास्तव काय आहे, हेही भाजपच्यात कार्यकर्त्यांनी सिद्ध करुन दाखवलंय.

हेही वाचा : तिलारी धरणाचे दरवाजे उघडले ही अफवाः कोरगांवकर

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!