धक्कादायकः पहिल्यांदाच मतदानासाठी आलेल्यावर घातल्या गोळ्या

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; सीआयएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर ओपन फायरिंग; गोळीबारात चौघांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ साठी शनिवारी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडलं. या निवडणुकीत याआधीही अनेक हिंसाचार झालेला पाहायला मिळालेत. परंतु शनिवारी झालेल्या हिंसाचारात चार जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.

हेही वाचाः कोरोनाला अटकाव करत पर्यटन क्षेत्र सुरू राहणं गरजेचं

सीआयएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर ओपन फायरिंग

कूचबिहारमध्ये सीतलकुची भागात भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांत झालेल्या झटापटीनंतर गोळीबार झाला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झालाय, तर चौघे गंभीर जखमी झालेत. केंद्रीय सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) ही ओपन फायरिंग करण्यात आली असल्याचं समजतंय.

हेही वाचाः स्कूटीचा अपघात, एक जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

गोळीबारात चार जणांचा मृत्यू, चार जखमी

मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचलेल्या एका १८ वर्षीय मतदाराचाही कथित गोळीबारात मृत्यू झाल्याचं समजतंय. या तरुणाचं नाव आनंद बर्मन असल्याचं समजतंय. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एका गावात सीआयएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर ओपन फायरिंगमध्ये चार जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचाः कणकवलीत झालं, करमळीत केव्हा होणार?

तृणमूल काँग्रेस हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप

आनंद हा भाजप समर्थक होता त्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलाय. कुटुंबानं तृणमूल काँग्रेसला या गोळीबारासाठी जबाबदार धरलं आहे.

हेही वाचाः ब्रेकिंग | राज्यात पुन्हा ५००पेक्षा जास्त नव्या रुग्णांचं २४ तासांत निदान

हत्येत भाजपचा हात – तृणमूल काँग्रेस

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसनं या हत्येच्या मागे भाजपचा हात असल्याचं म्हटलंय. गोळीबारात मृत्युमुखी पडलेले चार जण तृणमूलचे कार्यकर्ते होते असा दावाही पक्षाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचाः नगरपालिकांचा रणसंग्राम | कुठे किती जणांनी अर्ज मागे घेतले? वाचा सविस्तर

म्हणून जवानांना गोळीबार करावा लागला

स्थानिक लोकांनी सीआयएसएफ जवानांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जवानांना गोळीबार करावा लागला. दोन्ही पक्षांदरम्यान (भाजप आणि तृणमूल) हिंसाचार उफाळल्यानंतर स्थानिकांनी सीआयएसएफ जवानांना घेरून त्यांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सेंट्रल फोर्सनं ओपन फायरिंग केली.

पुढच्या ४ टप्प्यातील मतदानादरम्यान कडक बंदोबस्त

नव्या निर्णयानुसार बीएसएफच्या ३३ तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १२ तुकड्या, इंडो – तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या १३ तुकड्या, सशस्त्र सीमा सुरक्षा दलाच्या ९ तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ४ तुकड्या बंगालमध्ये पुढच्या ४ टप्प्यातील मतदानादरम्यान तैनात करण्यात येतील. सुरक्षेसंबंधी राजकीय वादापलिकडचा हा निर्णय आहे. हा केवळ दोन राजकीय गटांमधला संघर्ष घडलेला नाही तर सुरक्षा दलाच्या जवानांना जमावाने घेरण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे सुरक्षासंबंधी फेरआढावा घेऊन जादा कुमक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय दलाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

ममता – भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोपांची धुमश्चक्री

पश्चिम बंगालमध्ये आज होत असलेल्या मतदानाच्या चौथ्या टप्प्यात कुचबिहारमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोपांची प्रचंड धुमश्चक्री सुरू झाली असून कूचबिहारचा गोळीबार पूर्वनियोजित होता. गृहमंत्री अमित शहांच्या निर्देशावर कट रचण्यात आला असल्याचा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला, तर ममतांच्याच केंद्रीय दलांना घेरण्याच्या आवाहनामुळे हा हिंसाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

राजकीय वादाची धुमश्चक्री

तत्पूर्वी, कुचबिहारमध्ये झालेल्या हिंसाचारावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये राजकीय वादाची धुमश्चक्री उडाली होती. त्याचे पडसाद आजही उमटणे अपेक्षित आहे. ममता बॅनर्जी आज कुचबिहारमध्ये येणारेत.

हेही वाचाः FIRE | नागपूरमध्ये रुग्णालयात अग्नितांडव; तीन रुग्णांचा मृत्यू

गोळीबाराला अमित शहाच जबाबदार – ममता बॅनर्जी

कुचबिहारच्या सीताकुचली भागात झालेल्या गोळीबाराला अमित शहा हेच जबाबदार आहेत. नव्हे, त्यांनीच हा कट रचला. मी केंद्रीय दलांना दोष देत नाही कारण ते गृहमंत्र्यांच्या आदेशाखाली काम करतात. मला खात्री आहे, की कुचबिहारमधील गोळीबाराची घटना ही पूर्वनियोजित होती. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. आम्ही गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, असे ममता बॅनर्जी यांनी काल स्पष्ट केले होते.

हेही पहाः TAXI | टॅक्सीवाल्यांची मनमानी खपवून घेणार नाही! #Goa #Marathi #News

भाजपच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली

याच प्रकरणावरून भाजपच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनी तृणमूळ काँग्रेसच्या केडरला केंद्रीय सुरक्षा दलांचा घेराव करण्याची चिथावणी दिली म्हणूनच कुचबिहारची गोळीबाराची घटना घडली असल्याचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करून या घटनेचा अहवाल थेट दिल्लीला मागून घेतला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!