‘मुख्यमंत्री असताना काही केलं नाही, ते आता काय करणार’

विश्वजीत कृ. राणेंचा घणाघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

सत्तरी : ठाणे भागात आयोजित केलेल्या ऑल गोवा फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात विश्वजीत कृ. राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी राणे म्हणाले सत्तरीतील युवावर्ग आज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहेत हे पाहून अभिमान वाटतो आणि‌ ते चांगले कार्य करण्यास प्रयत्न करत आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

मी सदैव त्यांना मदत करण्यास प्रयत्न करणार असे विचार राणे यांनी मांडले. राणे म्हणाले की..

पर्ये मतदार संघाच्या विकासासाठी आपल्याला एक संधी द्या. पर्ये मतदार संघाच्या आताच्या परिस्थितीला माजी मुख्यमंत्री आणि पर्ये मतदार संघाचे आमदार प्रतापसिंह राणे हेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री असताना पर्ये मतदार संघाचा विकास करु शकले नाही ते आता कसला विकास करतील.

पर्ये मतदार संघाचा विकास करण्यासाठी आणि पर्ये मतदार संघात परीवर्तन घडविण्यासाठी युवा शक्तीने एकत्र येण्याची गरज आहे, असा विचार राणे यांनी मांडलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!