Video | आजच्या अपात्रता सुनावणीनंतर काय म्हणाले गिरीष चोडणकर?

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

ब्युरो : कॉंग्रेसच्या १० फुटीर आमदारांच्या अपात्रता याचिकेवर २९ एप्रिल रोजी अंतिम निर्णय देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सभापतींची राजेश पाटणेकरांनी ही माहिती दिली असल्याचं गिरीश चोडणकर यांनी म्हटलंय. यावेळी पत्रकारांशी बोलताना गिरीश चोडणकर यांनी सभापतींवर टीकाही केली आहे. कॉंग्रेस आमदार अपात्रता याचिका सुनावणीवेळी सभापतींसमोर भाजपचे नेते बसतात, भाजप नेते सांगतात त्याप्रमाणे सभापती वागतात, असा आरोपही गिरीश चोडणकरांनी केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!