‘हे’ आहेत श्रीलंकेचे नवे पंतप्रधान…

७३ वर्षीय विक्रमसिंघ हे सहाव्यांदा पंतप्रधान

Goan Varta Live | प्रतिनिधी

कोलंबो : राजकीय अराजकता आणि आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या श्रीलंकेला तारण्यासाठी युनायटेड नॅशनल पार्टीचे रनिल विक्रमसिंघे यांनी गुरुवारी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे. ७३ वर्षीय विक्रमसिंघ हे सहाव्यांदा पंतप्रधान झाले आहेत.
हेही वाचाःगोवा प्रशासकीय लवादाचे कर्मचारी ‘अडचणीत’…

पक्षाला निवडणुकीतून एकही जागा मिळाली नव्हती

त्यांचा पक्ष युनायटेड नॅशनल पार्टीला गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या पक्षाला निवडणुकीतून एकही जागा मिळाली नव्हती. पण त्यांच्या पक्षाला श्रीलंकेच्या संसदीय प्रणालीप्रमाणे राष्ट्रीय यादीनुसार एक जागा मिळाली होती. या राखीव जागेमुळेच रनिल विक्रमसिंघे खासदार बनले आणि आता ते श्रीलंकेचे पंतप्रधान बनले आहेत.
हेही वाचाःफोंड्यात व्होल्वो बस, प्रवासी बसमध्ये टक्कर…

चर्चेनंतर पंतप्रधान होण्यास तयार

सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सर्वपक्षीय सरकारच्या स्थापनेचे आश्वासन विरोधी पक्षांना दिले होते. सर्वपक्षीय सरकारचा नेता कोण होणार, याबाबत राजपक्षे यांनी अनेकांशी चर्चा केली. मात्र, पंतप्रधानपदावर एकमत होत नव्हते. अखेर गोटाबाया यांनी ज्येष्ठ नेते रानिल विक्रमसिंघे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली आणि त्यानंतर ते पंतप्रधान होण्यास तयार झाले.
हेही वाचाःलग्नाच्या दिवशी पहाटे वधूने घेतला गळफास…

राजपक्षे यांना देखील जबाबदार ठरवले गेले

रनिल विक्रमसिंघे यांचा २२५ सदस्यांच्या संसदेत केवळ एक खासदार आहे. श्रीलंकेतील राजकीय स्थिती पाहिली असता श्रीलंका पीपल्स फ्रीडम अलायन्सकडे १४५ खासदारांचं संख्याबळ आहे. एसजेबी पक्षाकडे ५४ आणि तामिळ नॅशनल अलायन्सचे १० खासदार आहेत. इतर पक्षांच्या खासदारांची संख्या १६ आहे. दुसरीकडे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला जाणार आहे. १७ मे रोजी राष्ट्रपतींवर अविश्वास ठराव आणला जाईल. यासंदर्भात संसदेच्या सभागृहातील अध्यक्षांच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात येण्याला राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांना देखील जबाबदार ठरवले गेले आहे.
हेही वाचाः१२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पर्यटक म्हणून…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!