फोंड्यात रवी‌ विरोधकांचा विजय, रितेश नाईकांचा पराभव

शांताराम कोलवेकर ८ विरुद्ध ७ मतांनी विजयी

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः फोंड्यात मंगळवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत रवी नाईक विरोधकांचा विजय झाला. रवी पुत्र रितेश नाईकांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत पराभव करत शांताराम कोलवेकरांनी ८ विरुद्ध ७ मतांनी विजय मिळवला. शांताराम कोलवेकर फोंडा भाजपचे अध्यक्षही आहेत.

हेही वाचाः आधी रुग्णांना जीवाची सुरक्षा द्या, मग पत्रकार-विरोधकांना दोष

गोवा फॉरवर्डने मोडली बोडगेश्वराची शपथ

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी म्हापशातील प्रसिद्ध देव बोडगेश्वराच्या चरणी भविष्यात भाजपला कधीच पाठिंबा देणार नसल्याची शपथ घेतली होती‌. मात्र फोंड्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपचे गटाध्यक्ष शांताराम कोलवेकरांना नगराध्यक्षपदी विराजमान करण्यात गोवा फॉरवर्डच्या व्यंकटेश ऊर्फ दादा नाईकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

कोलवेकरांनी घेतले ढवळीकरांचे आशीर्वाद

नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर शांताराम कोलवेकरांचे फोंडा भाजपच्या नेत्यांनी आभार मानले. स्वतः शांताराम कोलवेकरांनी विजयी झाल्यानंतर मगोप नेते सुदिन ढवळीकरांचे त्याच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले.

एकंदर पाहता फोंड्यात रवी नाईकांचा सर्व पक्षीय विरोधकांनी एकत्र येत रितेश नाईकांचा पाडाव केला. रितेश नाईकांच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेल्या कोलवेकरांवर भाजपने कोणतीच कारवाई केलेली नाही. भविष्यात भाजप कोलवेकरांविरुद्ध काही कारवाई करेल का, हे पहावं लागेल. कोलवेकरांना आतून भाजपची साथ असल्याची चर्चा फोंड्यात सुरू आहे हे महत्त्वाचं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!