मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

महाराष्ट्र सरकारला मोठा झटका

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात अत्यंत वादग्रस्त बनलेलं मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. महाराष्ट्र राज्यानं बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी यावर सुनावणी झाली. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत, अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलंय. ५० टक्केची मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण अवैध असल्याचं कोर्टानं सांगितलंय.

संभाजीराजे निकालावर काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगितीचा निर्णय दिला. निकाल हा निकाल आहे, पण मराठा समाजासाठी हे दुर्दैव आहे, असं मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलंय. माझा लढा गरीब मराठा घटकांसाठी होता, पण निकाल मान्य करावा लागतो, असं ते म्हणाले. दोन्ही सरकारनी आपली भूमिका जोमानं मांडली. महामारी सुरू असताना उद्रेक होऊ नये, अशी इच्छा असल्याचंही संभाजीराजे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!