‘नेत्यांना हजारो युनिट वीज मोफत, मग गरिबांनाही फुकट मिळाली, तर चुकलं कुठं?’

दिल्लीचे मंत्री सत्येंदर जैन यांचा सवाल

दयानंद राणे | प्रतिनिधी

वास्को : देशातील नेत्यांना हजारो युनिट वीज मोफत मिळते ,तर त्यांच्या घरी चालक व कामवाली म्हणून काम करणारया तसेच इतर सर्वसामान्यांना ३०० युनिट वीज मोफत मिळाली, तर त्यात चुकीचे काय आहे, असा सवाल दिल्लीचे वीज मंत्री सत्येंदर जैन यांनी उपस्थित केला. जैन यांचे रविवारी दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यावर ते स्थानिक पत्रकारांशी बोलत होते.

जे बोलते ते करतोच!

गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी मोफत वीज विषयावर खुल्या चर्चेचे दिलेले आव्हान जैन यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे सोमवारी होणारया खुल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी ते गोव्यात रविवारी पोहोचले. विमानतळावर आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष राहुल यांनी पुष्पगुच्छ देऊन जैन यांचे स्वागत केले. आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री हे देशातील एकमेव असे नेते आहेत की, ज्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली आहे. त्यामुळे ते जे आश्वासन देतात ते पूर्ण करतील हा विश्वास लोकांना आहे. ते आश्वासन पूर्ण करणार नाहीत, हा विचारही लोकांच्या मनाला शिवत नसल्याचे जैन यांनी सांगितले.

हेही वाचा : नवा जमीन घोटाळा : २२ प्रकरणे संशयाच्या घेऱ्यात, सरकारी कागदपत्रांमध्ये अफरातफर करून जमीनविक्री

डिबेटकडे लक्ष

केजरीवाल यांनी गोव्यात ३०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे, ते आश्वासन त्यांच्याकडून पूर्ण केले जाईल यात शंकाच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी दुपारी 3 वाजता सत्येंदर जैन आणि नीलेश काब्राल यांच्यामध्ये वन टू वन डिबेट होणार आहे. वीजप्रश्नावरुन नीलेश काब्राल यांनी दिलेलं चॅलेंज स्वीकारुन सत्येंदर जैन हे चर्चेसाठी समोर आले आहे. त्यांचं गोव्यात आगमन झालं असून आता नेमका हा वादविवाद कसा रंगतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान, या डिबेटच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लागलेले बॅनर्सही सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

हेही वाचा : Politics | AAP | मनीष सिसोदियांच्या गोवा दौऱ्याचा अन्वयार्थ #Goa #Marathi #News

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!