अधिवेशनाचा आखाडा LIVE | विरोधकांना सभापतींनी सुनावलं

Goan Varta Live | प्रतिनिधी
राज्यपालांचा अवमान केल्याप्रकरणी सभापतींनी विरोधकांना सुनावलंय. सभापती राजेश पाटणेकरांची विरोधकांना अखेरची ताकीद दिली. विरोधकांनी दाखवल्या होत्या राज्यपालांना काळ्या फिती, तसंच पोस्टरबाजीही राज्यपाल सभागृहातून जात असताना करण्यात आली होती.
गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी घेतलेला आक्रमक पावित्रा आणि एकूणच घोषणाबाजी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बरेच संतापले होते. त्यांनी विरोधकांच्या या कृतीचा निषेध करणारे ट्वीट केलं होतं. सोमवारी विरोधकांनी सभागृहात राज्यपालांप्रती जी कृती केली ती आयोग्य आणि असंसदीय होती, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. विरोधकांनी आपल्या कृतीचं सिंहावलोकन करावं आणि लोकशाही मुल्यांचं जतन करतानाच लोकांच्या हितार्थ काम करावं, असाही सल्ला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला होता.
तब्बेतीचं कारण पुढे करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवघ चार साडेचार मिनिटं भाषण केलं होतं. सविस्तर भाषण त्यांनी पटलावर ठेवून विधानसभेतून काढता पाय घेतला होता. त्यावरुन बराच गदारोळ झाला होता. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे सभापतींनी यावेळी विरोधकांना सुनावलंय. ही कृती अयोग्य असून यापुढे असं पुन्हा होता कामा नये, असं म्हणत सभापतींनी विरोधकांनी शेवटची ताकीद दिली आहे.

वाचा LIVE Updates – अधिवेशनाचा आखाडा