स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरीचा तिढा सोडवा- खंवटे

Goan Varta Live | प्रतिनिधी
रोहन खंवटेंनी मांडला स्वातंत्र्यासैनिकांच्या नोकरीचा मुद्दा, आझाद मैदानात स्वातंत्र्यसैनिकांचं सुरु आहे उपोषण
वाचा सविस्तर बातमी – प्रजासत्ताकदिनी स्वातंत्र्यसैनिकांचं उपोषण सुरूच
स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचं आंदोलन सुरु आहे. त्यांना नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्यापैकी अनेकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. यासंपूर्ण प्रक्रियेत स्वातंत्र्यसैनिकांची मुलं नोकरीपासून का वंचित राहिली, याचा संपूर्ण पाढा रोहन खंवटे यांनी मांडलाय.
मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं उत्तर
खंवटे यांच्या प्रश्नाला प्रमोद सावंत यांनी उत्तर दिलंय. याप्रश्नी व्यक्तिगत लक्ष घालून असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. हा प्रश्न मार्चपर्यंत सोडवला जाईल, असंही ते म्हणालेत. तसंच याप्रश्नी चर्चा सुरु असून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नमूद केलं आहे.