बिगर गोमंतकीयांची बोगस नावं मतदार यादीतून काढण्यासाठी आरजी मोहीम राबवणार

काणकोणमध्ये मनोज परब यांचं वक्तव्य

संजय कोमरपंत | प्रतिनिधी

काणकोण : बिगर गोमंतकीयाची बोगस नावे मतदार यादीत आहेत. ती नावे काढण्याची मोहीम सप्टेंबर महिन्यात सुरु करण्यात येईल. गोव्यातील ४० ही मतदारसंघातून निवडणूक लढविली जाईल. सध्या तरी ३३ मतदारसंघात सक्रिय काम सुरु असून २२ मतदारसंघात रेव्होल्यूशनरी गोवन्सला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून पुढील सरकार हे रेव्होल्यूशनरी गोवन्सचे असेल, असा विश्वास आरजी सुप्रिमो मनोज परब यांनी व्यक्त केलाय. ते काणकोणमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा – दहा हजार सरकारी नोकऱ्यांवर आरजीच्या टास्क फोर्सची करडी नजर

काय म्हणाले मनोज परब?

काणकोण येथील आनंदी अपार्टमेंट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी मनोज परबांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलंय. यावेळी त्यांच्यासमवेत काणकोणचे प्रशांत पागी, संजम नाईक आणि इतर लोक उपस्थित होते. काणकोणचे राजकारण सर्वत्र पोहोचले असून कार्यकर्त्याना कोणीच विश्वासात घेत नसल्याचं परबांनी म्हटलंय. ते म्हणाले की,

काणकोणचा जो विकास व्हायला हवा होता तो झाला नाही. काणकोणच्या कासाकरीता पार्टी बदलली. पण ज्यांना दूरदृष्टी नाही ते विकास कसा करतील. कृषीभवन बांधण्यासाठी घोषणा केली. पण ती पूर्ण व्हायला एक वर्ष लावले, तरी सुद्धा काहीच झाले नाही. स्वताच्या विकासाशिवाय काणकोणच्या आमदारांनी विकास केलाच नाही, असे सांगतानाच गोवा पोर्तुगीजापासून मुक्त होऊन ६० वर्षे झाली तरी काणकोणात अजुन मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. या ६० वर्षाच्या कार्यकिर्दित निवडून आलेल्या आमदारानी काय केलं?

Miss call देऊन सदस्य नोंदणी

आरजीची चळवळ काणकोणच्या लोकांना काही दिवसात दिसेल. दरम्यान, ४० ही जागा लढविणार असून काणकोणचा एक उमेदवार असणार आहे. उमेदवारीकरीता आम्ही कोणीच काम करीत नाहीत. आरजी हा राजकीय पक्ष करण्यात येईल, असे आम्ही ठरविले नव्हते. काणकोणात जेव्हा जाहीर सभा होईल, त्या सभेला १० ते १५ हजार लोकांची उपस्थिती लागणार आहे. विविध राजकीय पक्षाच्या विविध प्रकारच्या ऑफर्स येत आहेत. दगाबाज राजकीय पक्षांकडे आम्ही युती करणार नाहीच. क्रांतिकारी म्हणून आम्ही काम करीत आहोत आणि करत राहणार, असल्याचंही मनोज परब यांनी म्हटलंय. या अगोदरच्या राजकीय पक्षांना यापुढे कोणीच जवळ करणार नाही. बेकारांची यादी सध्या कोणत्याही पक्षाकडे नाही. पण ते काम आम्ही करणार आहोत. गोंयकारानाच खासगी किंवा सरकारी नोकरी मिळावी म्हणून आम्ही कार्य करीत आहेत. मिस्ड कॉल देऊन सभासद नोंदणी करायलाही आरजीनं सुरुवात केली असल्याचं मनोज परब यांनी म्हटलंय.

हेही वाचा – Politics | अरविंद केजरीवालांना ‘आरजी’चे प्रश्न

सप्टेंबर महिन्यापासून बिगरगोमंतकियाची मतं रद्द करण्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचं मनोज परबांनी सांगितलं. जे कोणत्याही राजकीय पक्षाने केले नाही ते आम्ही करून दाखवणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आतापर्यंत गोवाभर २५ हजार सभासद असून आता ३० ते ३५ हजार मिस्ड कॉल दिलेले सभासद आहेत. गोव्यातील ३३ मदारसंघात काम सुरु असून २२ मतदारसंघात आरजीला उत्तम पाठिंबा मिळत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा – लवकर बरे व्हा! आरजीचा विश्वजीत राणेंवर पलटवार

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!