‘गोवा सरकारमध्ये आरपीआयला भागीदारी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलंय’

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवलेंचं विधान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पर्वरी : केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेतली. गोव्याला मदत करण्याबाबत पूर्णपणे कटीबद्ध असल्याचं आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. सगळ्यांना न्याय देण्यासाठी पूर्णपणे काम करणार असल्याचं आठवलेंनी म्हटलंय. गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात गोव्यामध्ये उद्योगपतींनी आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत काम करणार असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पर्वरीतील सचिवालयावर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली.

Met Dr. Ramdas Athawale Ji, Union Minister of State for Social Justice and Empowerment, today at Assembly Complex in Porvorim. Discussed various issues including the building of Ambedkar Bhavan in Goa.

Posted by Dr. Pramod Sawant on Monday, 21 December 2020

दोन दिवसांचा दौरा

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या दोन दिवसाच्या गोवा भेटीवर आले आहेत. रविवारी सायंकाळी उशिरा त्यांचं दाबोळी विमानतळावर आगमन झालं होतं. बाळासाहेब बळसोडे, सतीश कोरगावकर आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. आठवले यांचा मुक्काम एमपीटीच्या गेस्ट हाऊसमध्ये आहे. तिथे त्यांनी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह चर्चा केली. राज्यामध्ये पक्षाच्या सदस्य नोंदणींचा आढावा घेतला. याप्रसंगी काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचे निवेदन त्यांना दिले.

सरकारमध्ये भागीदारी मिळणार?

गोव्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय यांच्या एकंदर समस्या आणि इतर विषयांवर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. रिपब्लिकन पक्षाला महामंडळ देण्यासंबंधीही त्यांनी चर्चा केली. सायंकाळी ते प्रमुख कार्यकर्त्यांसह बैठक घेणार आहेत. आरपीआयला सरकारमध्ये भागीदारी देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचं त्यांनी म्हटलंय.

पाहा संपूर्ण व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!