पालिका निवडणुकीचा रणसंग्राम! केपेत उपमुख्यमंत्री कवळेकरांचे 3 समर्थक बिनविरोध

केपेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांची निकाला आधीच सरशी

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : राज्यात पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यातील 6 नगरपालिकांसाठी 20 मार्चला मतदान होणार आहे तर उर्वरीत मडगांव, मुरगांव, म्हापसा, केपे आणि सांगे या 5 नगरपालिकांची निवडणूक 21 मार्चला होणार आहे.

हेही वाचा – पालिका आरक्षणावर आज सुप्रीम सुनावणी, संपूर्ण राज्याचं सुनावणीकडे लक्ष

केपेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरच किंगमेकर?

केपे नगरपालिका 13 नगरसेवकांची आहे. मात्र केपेत निवडणुकीआधीच स्थानिक आमदार बाबू कवळेकरांची सरशी झाल्याचे दिसत आहे. मंगळवारी केपे पालिकेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. याच दिवशी बाबू कवळेकर समर्थक 2 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यात वार्ड नंबर 7 मधून दयेश नाईक, वार्ड नंबर 1 मधून चेतन हळदणकर यांचा समावेश आहे. तर यापूर्वीच वार्ड नंबर 3 मधून सुचित्रा शिरवईकरांची बिनविरोध निवड झालीय. 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने केपेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांचं वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आलंय.

पाहा पणजीतील राजकारण –

काँग्रेसला धक्का

केपे नगरपालिकेत उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार रमेश नाईकांची भाजपा समर्थकांनी अडवणूक केल्याचा व्हिडीयो व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे राज्यभर मोठी संतापाची लाट उसळली होती. मात्र रमेश नाईकांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. रमेश नाईकांना अर्ज भरताना केलेल्या अडवणुकीचा काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांनी निषेध व्यक्त केला होता. रमेश नाईकांची त्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली होती. रमेश नाईकांनी अर्ज मागे घेतल्याने बाबू कवळेकर समर्थक चेतन हळदणकरांची बिनविरोध निवड झालीय त्यामुळे एकूणच केपेत राजकीय हालचालींना वेग आलाय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Breaking | अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी घडामोडींना वेग

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!