नगरपालिकांचा रणसंग्राम | कुठे किती जणांनी अर्ज मागे घेतले? वाचा सविस्तर

कोण जिरवणार? कोण मिरवणार?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : म्हापसा, मुरगाव, मडगाव, सांगे आणि केपे पालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत अखेर संपली आहे. उत्तर गोव्यातील म्हापशासह दक्षिण गोव्यात चार पालिकांच्या निवडणुकांसाठी २३ एप्रिलला मतदान पार पडणार आहे. तर २६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. १० एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती.

कुठे किती अर्ज मागे?

म्हापशात १४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता म्हापसा पालिका निवडणुकीत २० प्रभागातून ८१ उमेदवार रिंगणात आहेत.

मुरगावात ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं आता १२५ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तर मडगावात २५ प्रभागातून ९८ उमेदवार रिंगणात आहेत. १७ जणांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे.

सांगेमध्ये जैसे थे…

सांगे नगरपालिकेमध्ये कुणीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. एकूण ४३ उमेदवार सांगेमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर केपे मध्ये ७ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्याामुळे केपेमध्ये ५५ उमेदवार नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने असतील.

वाढत्या कोरोनामुळे नियमांचं पालन करत मतप्रक्रिया पूर्ण करण्याचं मोठं आव्हान राज्य निवडणूक आयोगापुढे असणार आहे. २३ तारखेला नेमकं किती टक्के मतदान या पाचही वादग्रस्त पालिकांसाठी होतं, ते पाहणं महत्त्वाचंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!