Politics | Top 10 | अधिवेशन संपलं | अखेरच्या दिवसाच्या महत्त्वाच्या घडामोडी
Goan Varta Live | प्रतिनिधी
१. हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस गाजला, मध्यरात्री अडीचपर्यंत विधानसभेचं कामकाज, महत्त्वाच्या विषयांवर अखेरच्या सत्रात चर्चा
- अखेरचा दिवस मध्यरात्रीपर्यंत गाजला
२. मोलेतील तिन्ही वादग्रस्त प्रकल्प रद्द करण्याचा खाजगी ठराव फेटाळला, 20 विरूद्ध 11 मतांनी ठराव निकाली, सरकार तिन्ही प्रकल्पांवरती ठाम
- तिन्ही प्रकल्पांवरती सरकार ठाम
३. राज्यात 12 दशलक्ष टनापेक्षा जास्त कोळसा हाताळणी करणार नाही, उलट ती कमी करण्यास प्रयत्न करू, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
- कोळसा हाताळणी कमी करू – मुख्यमंत्री
४. अदानी, जिंदाल यांना 250 कोटी भरावेच लागतील, प्रसंगी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागणार, सॅस न भरल्यास कोळसा वाहतूक बंद करावी लागेल, मुख्यमंत्र्यांचा इषारा
- अदानी, जिंदाल यांना 250 कोटी भरावेच लागतील
५. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे कायदेशीर होणार, विधानसभेत १९ विरूद्ध ९ मतांनी दुरूस्ती विधेयक मंजूर
- अनधिकृत बांधकामे कायदेशीर
६. तमनार वीज वाहिन्या वन्यजीव क्षेत्रात येत नाही, तमनार वीज प्रकल्प न उभारल्यास राज्यात लोडशेडींग उद्भवणार, भीषण वीजसंकट ओढवण्याची वीजमंत्री निलेश काब्राल यांनी व्यक्त केली भीती, कुठेतरी कोळसा जळतो म्हणूनच गोव्यात प्रकाश पडतो
- तमनार ही काळाजी गरज – वीजमंत्री काब्राल
७. लोकांची सुरक्षा आणि आरोग्यासाठी रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प रद्द करा, आमदार एलिना साल्ढाणा यांचं भावनिक आवाहन, विधानसभेत भाजप सरकारला एलिना साल्ढाणा यांचा घरचा आहेर
- भाजपला साल्ढाणांचा घरचा आहेर
८. गोवा सरकार सर्व घटकांना विश्वासात घेऊन नवीन शैक्षणिक धोरण राबवणार, मुख्यमंत्र्यांची सभागृहात ग्वाही
- नव्या शैक्षणिक धोरणावर मुख्यमंत्र्यांची ग्वाही
९. मडगाव नेहरू स्टेडीयमला प्रतापसिंह राणेंचं नाव द्या- सुदिन ढवळीकरांची मागणी, तर एका स्टॅंडला तत्कालीन क्रीडामंत्री मोन्त क्रुज यांचं नाव द्या, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आग्रही
- फातोर्डा स्टेडीयमचं नाव बदलणार?
१०. हायकोर्टाचं नवं वेळापत्रक जारी, १ फेब्रुवारीपासून सकाळी ९ ते १२ आणि दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत कामकाज चालणार, नव्या वेळापत्रकामुळे गैरसोय होण्याची शक्यता
- हायकोर्टाचं नवं वेळापत्रक जारी