तुमचं काम बोलायलं हवं, ना तुमचा चेहरा; तुमची सर्व उर्जा विभागाच्या कामासाठी लावा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं नव्या मंत्रिमंडळाचं मार्गदर्शन; दिला कानमंत्र

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्रिमंडळाचा वर्ग घेतला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यात तब्बल ४३ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गुरुवारी या सर्व मंत्र्यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन केलं. यात मंत्र्यांनी काय करावं आणि काय नाही याबाबत मोदींनी कानमंत्र दिला.

हेही वाचाः VIDEO VIRAL | रस्त्यावर पोलिसांचा बाप काढला; पोलीस ठाण्यात आणताच ढसाढसा रडला

जुन्या मंत्र्यांना व्यवस्थेमुळे हटवलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जुन्या मंत्र्यांना व्यवस्थेमुळे हटवण्यात आलं आहे. त्याचा संबंध त्यांच्या क्षमतेशी नाही. नवीन मंत्र्यांनी जुन्या मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडून अनुभवाचा फायदा घ्यावा. त्याचसोबत मंत्र्यांनी मीडियाच्या विनाकारण वक्तव्यं न करण्याचा सल्लाही मोदींनी दिला आहे. तुमचं काम बोलायलं हवं, ना तुमचा चेहरा. तुमची सर्व उर्जा विभागाच्या कामासाठी लावा. आगामी अधिवेशनात सर्व मंत्र्यांनी पूर्ण तयारीने संसदेत यावं. महत्त्वाचं म्हणजे सर्व मंत्र्यांनी सकाळी ९.३० वाजता कार्यालयात आलं पाहिजे असं मोदींनी सांगितलं.

हेही वाचाः मायकल लोबोंच्या हस्ते ‘जीएसआरएलएस’खाली मसाला विभागाचे उद्घाटन

हे चांगलं दृश्य नाही

या बैठकीत कोरोना स्थितीचाही उल्लेख करण्यात आला. पर्यटनस्थळी होणारी गर्दी आणि निष्काळजीपणा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता लोकं घराबाहेर पडत आहेत. परंतु कोरोना महामारीचा धोका अद्याप टळला नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवावं. व्हायरस सातत्याने म्यूटेंट बदलत आहे. मागील काही दिवसांपासून मी गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या लोकांचे फोटो, व्हिडीओज बघतोय. हे चांगलं दृश्य नाही. या प्रकारापासून आपल्याला घाबरायलं हवं, अशा बेजबाबदारपणाला कुठेही थारा दिला जाणार नाही असं मोदींनी बजावलं. एक छोटी चूक आपल्यासाठी संकट बनू शकते. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करायला हवं.

हेही वाचाः मांद्रे मतदारसंघात काँग्रेसचे दोन गट कार्यरत

काय करावं?

सकाळी ९.३० वाजता सर्व मंत्र्यांनी कार्यालयात यावं
स्वतःच्या कामावर फोकस करा
जुन्या मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडून अनुभवाचा फायदा घ्या

हेही वाचाः कृषी हाच गोव्याचा शाश्वत व्यवसाय

काय करू नका?

विनाकारण वादग्रस्त विधानं टाळा
फक्त चेहरा चमकवण्याचं टाळा, काम करा
संसदेत अपूर्ण तयारीने कधी येऊ नका

हेही वाचाः हवामान खात्याकडून राज्यात यलो, ऑरेंज अलर्ट जारी

‘या ‘ मंत्र्यांना मिळालं प्रमोशन

अनुराग ठाकूर, जी. के रेड्डी, मनसुख मंदाविया, किरण रिजिजू, आर.के सिंह, हरदीप सिंह पुरी आणि पुरुषोत्तम रुपाला यांना प्रमोशन मिळालं आहे. हे सर्व राज्यमंत्री होते, आता या सातही जणांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!