टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही दिलासा नाही!

अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबबाबत कोणतीही घोषणा नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः विकासदर निचांकी पातळीवर पोहोचलेला असताना, कोरोनाव्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे. भारतापुढची आर्थिक आव्हानं वाढलेली असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांचं तिसरा अर्थसंकल्प मांडला आहे. यामधून सर्वसामान्यांना दोन गोष्टींची अपेक्षा होती. एक रोजगार संधींना चालना देणारे काही निर्णय घेणार का? आणि आयकरात काही बदल होणार का? मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कररचनेत कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलंय. जुने स्लॅब कायम ठेवण्यात आल्यानं सामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

२०१९ अर्थसंकल्प

2019 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने इन्कम टॅक्समधून सूट मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ केली होती. 5 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त होतं. गेल्या वर्षीसुद्धा एवढीच करमुक्ती होती. स्टँडर्ड डिडक्शनसुद्धा त्याच वर्षी वाढवून 50 हजार करण्यात आलं होतं. त्यानंतर हा आकडा बदलेला नाही. या वर्षी अर्थमंत्री करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणि स्टँडर्ड डिडक्शनची रक्कम बदलण्याचे संकेत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!