ज्येष्ठतेत फेरबदल! मॉविन्ह चौथ्या तर मायकल अखेरच्या स्थानी

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाच्या ज्येष्ठता यादीत अचानक बदल केला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय. या यादीत मॉविन गुदिन्हो यांना चौथ्या स्थानावर आणण्यात आलंय. तर महसूलमंत्री जेनिफर मॉन्सेरात यांना दहाव्या स्थानावर नेण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या मायकल लोबो यांना अखेरचं स्थान देण्यात आलंय.

१५ जुलै २०१९ रोजीच्या अधिसूचनेप्रमाण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पहिल्या तीन स्थानावर होते. चौथ्या स्थानावर महसूलमंत्री जेनिफर तर पाचव्या स्थानावर नागरीपुरवठा मंत्री गोविंद गावडे होते. त्यानंतर सहा ते दहाव्या स्थानावर अनुक्रमे जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस, ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो, वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांची नावे होती. वीजमंत्री नीलेश काब्राल अकराव्या तर, बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर बाराव्या स्थानावर होते.
सर्वसामान्य प्रशासनाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सल्ल्याप्रमाणे २ फेब्रुवारीला अधिसूचना जारी करून मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकार आणि तिसऱ्या क्रमांकावर मनोहर आजगावकर यांची नावे आहेत. नव्या यादीनुसार मंत्री राणे सहाव्या, मिलिंद नाईक सातव्या, नीलेश काब्राल आठव्या, फिलीप नेरी नवव्या आणि जेनिफर दहाव्या स्थानावर आहेत. अकराव्या स्थानावर पाऊस्कर आणि बाराव्या स्थानावर लोबो आहेत.
नवीन मंत्रीमंडळ जेष्ठता यादी
प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
चंद्रकांत कवळेकर, उपमुख्यमंत्री
मनोहर आजगांवकर, उपमुख्यमंत्री
मॉवीन गुदिन्हो, पंचायत मंत्री
गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री
विश्वजीत राणे, आरोग्य मंत्री
मिलिंद नाईक, शहर विकास मंत्री
नीलेश काब्राल, वीज मंत्री
फेलीप नेरी रॉड्रीग्स, डब्ल्युआरडी मंत्री
जेनिफर मोन्सेरात, महसुल मंत्री
दीपक प्रभू पाऊसकर, पीडब्ल्युडी मंत्री
मायकल लोबो, कचरा व्यवस्थापन मंत्री
हेही वाचा – मंगेशकर, तेंडुलकर शेतकरी विरोधी बनलेत का? ट्विटरवर दोघांवरही तुफान टीका
महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी!