महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

उपमुख्यमंत्री पदी कोण?

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत सर्वांना आश्चर्यचकित करणारी घोषणा केली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून थेट एकनाथ शिंदेच्या नावाची घोषणा केली. राजभवनावर राज्यपालांशी भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा:कॅसिनो, ऑनलाईन गेमिंगबाबत ‘जीएसटी’कडून दिलासाचे संकेत ‍

पंतप्रधानांनी युतीचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली होती

यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील व इतर भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, सर्वांना कल्पना आहे की 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 170 लोक निवडून आले होते. साहजिकच ही अपेक्षा होती की भाजपा शिवसेना युतीचं सरकार येईल तेव्हा पंतप्रधानांनी युतीचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली होती.
हेही वाचा:राजस्थानमध्ये महिनाभरासाठी संचारबंदी, ‘हे’ आहे कारण… ‍

साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार

लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपाचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील. मी स्वत: बाहेर असेन. पण हे सरकार पूर्ण, व्यवस्थित चालले पाहिजे ही जाबाबदारी माझीदेखील असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार,” अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा:कोरोनामागोमाग आणखी भयंकर आजाराची साथ… ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!