नावात काय आहे? मिश्रांऐवजी काँग्रेसची पी. के. शर्मांना साथ

गोवा काँग्रेसने पी के मिश्रा यांच्या नावातच घोळ केल्यानं आता एका नव्या वादालाच तोंड फुटण्याची शक्यता जास्त आहे.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : नावात काय आहे, असं शेक्सपिअरने म्हटलं होतं. पण हे सांगतानाही शेक्सपिअरचं नाव घ्यावं लागतं, हे विशेषच. अशातच ज्यांना पाठिंबा द्यायचा, त्याचं नाव मात्र चुकीचं छापलं जाणं, ही गंभीर चूक काँग्रेसकडून घडली आहे. पी.के. मिश्रांऐवजी काँग्रेसने पी.के शर्मा असं नाव छापल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मावळत्या लोकायुक्तांनी गोव्यातील भाजप सरकारवर तिखट शब्दांत टीका केली. त्यानंतर राजकीय प्रतिक्रियांना वेग आलाय. भाजपने पी के मिश्रांवर पलटवार केला होता. अशात काँग्रेसने माजी लोकायुक्तांचा मुद्दा लावून धरत त्यांच्या वक्तव्याचं एक प्रकारे समर्थनच केलंय. मात्र पी के मिश्रा यांच्या नावातच घोळ केल्यानं आता एका नव्या वादालाच तोंड फुटण्याची शक्यता जास्त आहे.

लोकायुक्तांच्या निवाड्यावर काँग्रेस कोर्टात
माजी लोकायुक्त पी.के मिश्रांनी केलेल्या कारवाईच्या शिफारसी सरकार चालीस लावण्यास तयार नाही. काँग्रेस लवकरच माजी लोकायुक्तांच्या निवाड्यांवर कारवाई व्हावी यासाठी कोर्टात जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून लोकायुक्तांनी दिलेल्या २१ अहवालांची स्वेच्छा दखल न्यायालयाने घ्यावी, व कोर्टाच्या देखरेखेखाली चौकशी करण्याची मागणी काँग्रेस करणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!