मोपा विमातळाच्या रस्त्यासंदर्भात मोठी बातमी आली!

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : एकीकडे मोपा विमानतळाचा विषयाचा वाद सुरु असतानाचा एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं मोपा विमानतळाच्या रस्त्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. धारगळ ते मोपा विमानतळ लिंक रोडसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे.

काय आहे अधिसुचना?

धारगळ ते मोपा विमानतळ लिंक रोडसाठी केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयानं भूसंपादनाची अधिसुचना जारी केली आहे. या अधिसुचनेप्रमाणे 46.6693 हेक्टर जमिनीचं संपादन करण्यात येणार आहे.

हेही वाचा – EXCLUSIVE STORY | धारगळ बनणार पंचतारांकित डेस्टीनेशन

मोपावरुन राजकारणही तापलं

‘आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ प्रकल्प व पेडणे मतदारसंघात आणलेले सर्व प्रकल्प  हे उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांचे खिसे भरण्यासाठी असून आजगावकर  यांनी स्वतःचे खिसे आणि आपल्या कुटुंबीयांचे खिसे या प्राकल्पातून भरले आहेत, यापुढे बाबू आजगावकर यांनी पेडणेकरांचा आपण नोकर आणि सेवक असणारे, असे विधान करु नये. आजगावाकर यांनी, मोपा विमानतळ प्रकल्पातून किती  नोकऱ्या दिल्या ते जाहीर करावं’, असं आवाहन पेडणे मतदारसंघाचे मगो पक्ष प्रवक्ते उमेश तळवणेकर यांनी पत्रकार परिषदेत केलंय. वर्षाच्या सुरुवातीलाच मालपे येथे मगो पक्षाच्यावातीने मगो पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उमेश तळवणेकर बोलत होते.

पाहा व्हिडीओ – Mopa | पर्यटन धोरणाबाबत सरकार श्वेतपत्रिका काढणार?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!