आरजीच्या मनोज परब, रोहन कळंगुटकरला मेळावलील जायला कोर्टाची बंदी

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : मेळावलीप्रकरणी कोर्टानं एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. गुन्हा नोंदवण्यात आलेल्या रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांना कोर्टानं सशर्त जामीन मंजुर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे येत्या दोन महिन्यात मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांना मेळावलीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांना क्राईम ब्रांचमध्येही बोलवल्यानंतर त्यांना पोलिस स्थानकातही हजेरी लावण्यात येणार आहे.
गेल्या बुधवारीच मेळावलीमध्ये मोठा तणाव पाहायला मिळाला होता. त्यानंतर मेळावलीतील आंदोलनानंही उग्र रुप धारण केल होतं. दरम्यान, रिव्हॉल्यूशनरी गोवन्सही मेळावलीवासीयांना पाठिंबा दिला होता. वाळपईमध्ये जेव्हा मेळावलीतील लोकांनी मोर्चा काढला होता, तेव्हा तिथे मनोज परबही हजर होते. तिथे त्यांनी पोलिस बळाचा वापर करुन सरकारनं दडपशाही सुरु केल्याचा आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली होती. दरम्यान, त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात मनोज परब आणि रोहन कळंगुटकरांना सशर्त जामीन देण्यात आला आहे.
— Goanvartalive (@goanvartalive) January 13, 2021
मनोज परब यांचा सरकारवर घणाघात
रिव्हॉल्यूशनरी गोवन्स यांनी फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करत सरकारविरोधात नेमकी काय वक्तव्य केली होती, ते पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
विश्वजीत राणेंवरही हल्लाबोल
हेही वाचा – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे अस्वस्थ झाले आणि…