मनोज परब म्हणतात, कचऱ्यातूनही महसूल मिळवून दाखवू

गोव्यातही कचऱ्यापासून महसूल मिळवून देणार-

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी – आरजी सुप्रिमो मनोज परब यांनी कचऱ्यातून गोवा राज्यालामहसूल मिळवून देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय. इतरराज्यांप्रमाणेच गोव्यातही कचऱ्यातून अर्थार्जन करणं शक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

यावेळी त्यांनी कचऱ्याच्या प्रश्नावर लक्ष वेधतमायकल लोबो यांच्यावर टीका केलीये. मनोज परब यांनी म्हटलंय की…

काय म्हणाले मनोज परब?

जर इतर राज्य कचऱ्यातून देखील महसूल गोळा करत असतील तरमग गोव्यानेच मागे का राहावे? मायकल लोबो यांनी दोन वर्षांपूर्वीमंत्रिपदासाठी हताशपणे भीक मागितली आणि गोव्याचे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांना किनारपट्टीच्या समस्या सोडवण्यासाठी ‘कचरामंत्री’ म्हणून नियुक्त करण्याची विनंती मायकल लोबोंनी केली. कचऱ्याच्या प्रश्नावर राज्यासमोर मोठे आव्हान उभं ठाकलंय. पणमायकल लोबोंनी कचराप्रश्न सोडवण्यासाठी काहीच केलं नाही.

दरम्यान, विधानसभेत आरजीनं बाजी मारली तर कचऱ्याची समस्यातत्काळ सोडवण्याबाबत आरजी प्रयत्नशील असेल, असं मनोजपरबांनी म्हटलंय. इतकंच काय तर तर पुढे त्यांनी खोट्याआश्वासनांनी बळी न पडण्याचं आवाहनही लोकांना केलंय. ते म्हणाले की…

जे लोक केवळ कचऱ्याच्या नावाने आवाज करतात आणि कचरामंत्रालयाची मागणी करतात. परंतु कचऱ्याच्या समस्येला तोंडदेण्यासाठी ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरतात. अशामाणसांच्या घाणेरड्या राजकारणाला बळी पडू नका. गोव्यात कचराव्यवस्थापन ही सर्वात मोठी समस्या आहे आणि सरकार कचऱ्यावरप्रक्रिया करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गोव्यासाठी एकमजबूत कचरा व्यवस्थापन योजना बनवण्याची आमची योजना आहे. जर इंदूर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनू शकत असेल आणिसंपूर्ण कचरा व्यवस्थापनातून महसूल मिळवून देऊ शकत असेल तरआपण का करू शकत नाही.

कचरा प्रश्नावर आरजीनं सविस्तर अभ्यास केल्याचंही मनोज परबांनीम्हटलंय. गेल्या 25 वर्षांपासून अनेक आमदार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनीकचऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात जगभर प्रवास केला, पणत्यातून साध्य काहीच झालं नाही.

जीएसआरपी सरचिटणीस, मयूर आस्तेकर यांच्यासह परब इंदूर स्मार्टसिटीमधील कचरा व्यवस्थापनाच्या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठीदोन दिवसांसाठी इंदूरमध्ये जाऊन आले. त्या अभ्यासाअंती त्यांनीकचराप्रश्नावरुन त्यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!